बॉलीवूड स्टार सलमान खानची गणना चित्रपटसृष्टीतील मदत करणाऱ्या व्यक्तींमध्ये केली जाते. सलमान खान आता करोडोंची कमाई करत असला तरी एकेकाळी त्याच्याकडे पैशांची फार कमतरता होती. नुकत्याच झालेल्या एका इव्हेंटमध्ये सलमान खानने खुलासा केला आहे की, त्याच्याकडे पैसे नसताना फिल्म इंडस्ट्रीतील लोकांनी त्याला उघडपणे कशी मदत केली.(Sunil Shetty, Salman Khan, Bollywood, Movies, Film Industry, Clothing,)
आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देताना सलमान खान म्हणाला, एक काळ असा होता जेव्हा माझ्याकडे आज आहेत इतके पैसे नव्हते. माझ्याकडे फक्त शर्ट किंवा जीन्स विकत घेण्यासाठी पुरेसे पैसे होते. त्या काळात स्टोन-वॉश जीन्स ही नवीन फॅशन होती.
मी एका लोकप्रिय स्टोअरमध्ये खरेदीसाठी बाहेर पडलो होतो जिथे मला स्टोन वॉश डेनिम जीन्स आणि शर्ट दिसला. माझ्याकडे फक्त जीन्स खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे होते, म्हणून मी शर्ट विकत घेतला नाही. त्यावेळी दुकानात माझ्यासोबत सुनील शेट्टी होता, त्याच्या लक्षात आले की, माझ्याकडे शर्ट घेण्यासाठी पैसे नाहीत. तेव्हा सुनीलने तो शर्ट विकत घेतला आणि मला भेट म्हणून दिला.
याच कार्यक्रमादरम्यान सलमान म्हणाला की, अभिनयात पदार्पण केल्यानंतरचे त्याचे दिवस फार चांगले नव्हते. तो म्हणाला, ‘मैने प्यार किया’ रिलीज झाल्यानंतर भाग्यश्रीने चित्रपट न करण्याचा आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याला या चित्रपटाचे संपूर्ण श्रेय मिळाले आणि पुढील 6 महिने माझ्याकडे कोणतेही काम नव्हते.
यानंतर माझ्या आयुष्यात एक दयाळू माणूस आला. देवाने रमेश तौरानीला पाठवले. त्यावेळी माझ्या वडिलांनी 2000 हजार रुपये दिले आणि निर्माते जीपी सिप्पी यांना त्यांनी मला त्यांच्या चित्रपटात साईन केल्याची खोटी बातमी एका मासिकाला सांगण्यास सांगितले. या फेक न्यूजनंतर रमेश तौरानी स्वतः सिप्पी साहबच्या ऑफिसमध्ये आले आणि चित्रपटाच्या म्युजिक राईट्ससाठी 5 लाख रुपये दिले.
या 5 लाख रुपयांमुळेच मला ‘पत्थर के फूल’ हा चित्रपट मिळाला. यानंतर सलमान खानने निर्माते बोनी कपूर यांनाही मिठी मारली. मग तो म्हणाला, ‘बोनी जींनी मला आयुष्यभर मदत केली. जेव्हा माझे करिअर खडतर टप्प्यातून जात होते, तेव्हा बोनीजींनी मला ‘वॉन्टेड’ हा चित्रपट दिला ज्यामुळे मी परत आलो.’
यादरम्यान सलमान विनोदाच्या स्वरात म्हणाला, ‘यानंतर बोनीजींनी मला ‘नो एंट्री’ चित्रपट दिला ज्यामुळे अनिल कपूर पुनरागमन करू शकला. सलमानच्या या बोलण्यावर कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्वजण हसू लागले.
महत्वाच्या बातम्या
राज्यात काळी जादूच्या फंद्यात अडकले मोठे व्यापारी; काहींना लागलं वेड, तर काही झाले उद्ध्वस्त
आपण पंतप्रधान होणार आहे हे मोदींना २००४ मध्येच कळलं होतं; जाणून घ्या सत्य साईबाबांसोबतचा ‘तो’ किस्सा
‘या’ दोन बड्या नेत्यांवर गंभीर आरोप करत वसंत मोरेंच्या कट्टर समर्थकाने सोडली मनसे
सलमान खानला धमक्या आल्यानंतर मुंबई पोलिस ऍक्शन मोडमध्ये, उचलले ‘हे’ मोठे पाऊल