महाशिवरात्रीच्या निमित्ताने ‘या’ अभिनेत्रीने धारण केला अर्धनारीश्वरचा अवतार; लोकं हात जोडत म्हणाले…

महाशिवरात्रीला या अभिनेत्रीने धारण केलेले ‘अर्धनारीश्वर’चे रूप बघून लोक चकितच झाले. ही अभिनेत्री ‘अर्धनारीश्वर’ रुपात स्कूटीवरून चालली होती. लोकांना स्कूटीवरचे ‘भोले बाबा’ पाहून आश्चर्याचा धक्काच बसला.

महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर अभिनेत्री एकता जैन हिने अर्धनारीश्वराचे रूप धारण केले आहे. यानंतर ती मुंबईच्या रस्त्यावर या रुपात स्कूटी चालवताना दिसली आहे.

मंगळवारी मुंबईतील लोकांना स्कूटीवर भगवान शंकराचे अर्धनारीश्वर रूप पाहून धक्काच बसला. जांभळ्या रंगाच्या स्कूटीवर अर्धनारीश्वराचे रूप धारण केलेल्या या कलाकाराने लोकांमध्ये श्रध्दा जागवली.

ज्या रस्त्यावरून ही स्कूटी गेली त्या रस्त्यावरून लोक हात जोडून हर हर महादेव आणि बम बम भोलेचा जयघोष करताना दिसत होते. यानंतर समजले की, ही अभिनेत्री एकता जैन आहे. एकताने केवळ महाशिवरात्रीच्या दिवशी अर्धनारीश्वराचे रूप धारण केले नाही तर डमरू आणि त्रिशूलसह विपुल नृत्य देखील केले.

भगवान शंकराची आराधना केल्यानंतर ती या रुपात शूटिंगसाठी निघाली. तीन तासांच्या मेकअपनंतर एकता या रुपात दिसली. शगुन, शकलाका बूम बूम, फॅमिली नंबर 1 आणि अपून तो बस वैस या टीव्ही शोमध्ये दिसलेली आहे.

एकता जैन म्हणते की, महादेवाच्या आशीर्वादानेच माझं करियर यशस्वी आहे. ती म्हणते, यामुळे मी खूप खूश आहे. “मला वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची संधी मिळत आहे. याचा मला आनंद आहे आणि भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादांचा वर्षाव माझ्यावर असाच होत राहो अशी माझी इच्छा आहे.”

महत्वाच्या बातम्या
रोहित यशस्वी कर्णधार ठरण्यामागे आहे ‘या’ क्रिकेटपटूचा हात; माजी क्रिकेटपटूचा मोठा गौप्यस्फोट
आयपीएलमध्ये ‘या’ संघाकडून रैनाची होणार धमाकेदार एन्ट्री, व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण