‘बिग बॉस‘ची ओटीटी प्लॅटफॉर्म स्पर्धक आणि सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. आपल्या युनिक स्टाईल आणि असामान्य शैलीने तिने ही ओळख निर्माण केली आहे. आजच्या काळात इतर अभिनेत्रींप्रमाणे तिचेही लाखो फॅन फॉलोइंग आहेत. तिच्या चाहत्यांना तिची प्रत्येक स्टाईल खूप आवडते, परंतु सध्या उर्फी मीडियावर काहीशी नाराज असल्याचे दिसत आहे.(on-the-media-angrred-urfi-javed-also-dragged-samantha-into-controversy)
खरं तर गोष्ट अशी आहे की सामंथा रुथ प्रभूच्या(Samantha Ruth Prabhu) हेडलाइनमध्ये तिच्या ड्रेसबद्दल चांगली हेडलाईन टाकण्यात आली होती आणि तिची प्रशंसा करण्यात आली होती, ज्याबद्दल उर्फी रागावलेली दिसते, कारण बातमीच्या हेडलाइनमध्ये तिच्या ड्रेसची मच्छरदाणी म्हणून टिंगल करण्यात आली होती.
यासोबतच यूजर्स तिला ट्रोलही करत आहेत, असं सांगण्यात आलं आहे. याबद्दल संताप व्यक्त करताना उर्फी जावेदने(urfi javed) ‘मीडिया आपल्याशी भेदभाव करते’ असं म्हटलं आहे. हे स्क्रीनशॉट शेअर करताना उर्फीने लिहिले की, ‘जेव्हा ती ट्रान्सपरंट कपडे घालते तेव्हा गोंधळ होतो आणि तिला ट्रोल केले जाते पण जेव्हा समंथा असे कपडे घालते तेव्हा तिच्या कपड्यांचे कौतुक केले जाते’.
याआधीही उर्फीने आपल्याला चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडून इंडस्ट्रीत काम दिले जात नसल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. त्यांना बी ग्रेड चित्रपटात(B grade movie) काम करण्याच्या सूचना दिल्या जातात. यापूर्वी तिने याबद्दल खुलासा केला होता कि, फेसबुकवरून तिचा एक फोटो कसा उचलला आणि पॉन साइटवर टाकला. त्यावेळी ती 15 वर्षांची होती.
उर्फी तिच्या वक्तव्यांमुळे आणि फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. उर्फी जावेदने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे, परंतु बिग बॉस ओटीटीनंतर उर्फी प्रसिद्धीच्या झोतात आली. उर्फी या वेगळ्या स्टाईलमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर अधिक असते आणि त्यामुळे तिला नकारात्मक लोकप्रियताही मिळाली आहे.