Share

अजब! धुलवडीच्या दिवशी जावयाची निघते गाढवावरून वरात, ‘या’ गावातील प्रथेची पुर्ण देशात चर्चा

महाराष्ट्रातील कित्येक भागात अजून देखील वेगवेगळ्या रुढी परंपरा मानल्या जातात. अनेक गावांमध्ये तर या परंपरा किती विचित्र असल्या तरी त्या अंमलात आणल्या जातात. केज तालुक्यातील विडा गावात देखील अशीच एक ९० वर्षांची जुनी परंपरा पुन्हा पूर्वरत करण्यात आली आहे. कोरोना काळात गेली दोन वर्षे या परंपरेत खंड पडला होता. मात्र आता होळीचे निम्मित साधत गावकऱ्यांनी या परंपरेचा शुभारंभ केला आहे.

केज तालुक्यातील विडा गावात धुलवडीच्या दिवशी जावयाची वरात गाढवावरुन काढण्याची खूप जुनी प्रथा आहे. या परंपरेने ९० वर्षे पार केली आहेत. एकदा ही गावकऱ्यांकडून ही परंपरा मोडली गेलेली नाही. किंवा या परंपरेला कोणी विरोध केलेला नाही. गेली दोन वर्षे कोरोनामुळे परंपरा पुढे चालविण्यात आली नाही. गावात गर्दी नको या कारणांने कोणीही या प्रथेचे दोन वर्षात नाव काढले नाही.

परंतु आता कोरोना विषाणूचे सावट कमी झाल्यामुळे गावकऱ्यांनी या प्रथेला पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी धुलवडीला गावकरी गावातील एका जावयाची गाढवावरुन वरात काढणार आहे. यासाठी गावकरी जावयाच्या शोधात आहेत. गाढवावरुन वरात काढणाऱ्या जावयाला गावात विशेष मान देण्यात येतो.

सर्वप्रथम या जावयाची गाढवावरुन मिरवणुक काढण्यात येते. यानंतर जावयाला हार घालून पुष्पगुच्छ देण्यात येतो. या परंपेरचा सर्वजन मान ठेवतात. कोणीही याला विरोध करण्याचा प्रयत्न करत नाही. जो जावई मनाने मिरवणूकीसाठी तयार होईल त्यालाच हा मान देण्यात येतो. विशेष म्हणजे सर्व गाव मिरवणूक पाहण्यासाठी जमा झालेला असतो.

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तत्कालीन जहागीरदार ठाकूर आनंदराव देशमुख यांचे बाळनाथ चिंचोली (जि. लातूर) येथील मेहुणे धूलिवंदनाच्या दिवशी विड्याला आले होते. आल्यानंतर सर्वांनी त्याचा मानपान ठेवला. तसेच त्यांना हवे ते सर्व काही पुरवण्यात आले.

मात्र शेवटी परत जाताना गावकऱ्यांनी त्यांची मस्करी उडवत गाढवावरून वरात काढण्याचा विचार केला. यावर मेहुण्यांनी देखील होकार देत गाढवावरुन आपली वरात काढण्यास परवाणगी दिली. त्यानुसार खरच मेहुण्यांची गावभर वरात काढण्यात आली. शेवटी त्यांना जावयाचा मानपान ही देण्यात आला.

तेव्हापासून ते आतापर्यंत विडा गावात ही प्रथा राबवली जात आहे. कोणीही या प्रथेविषयी मनात नाराजी ठेवत नाही. तसेच या प्रथेवरुन जावाई फुगुन देखील बसत नाही. आता दोन वर्षांनंतर गावात पुन्हा ही प्रथा राबवली जाणार आहे. यासाठी गावकऱ्यांनी जावयाचा शोध सुरु केला आहे.

महत्वाची बातमी
IPL 2022: रवि शास्त्रींची सुरेश रैनासोबत धमाकेदार एन्ट्री, आयपीएलमध्ये सांभाळणार मोठी जबाबदारी
काश्मिर फाईल्सबाबत अजित पवारांनी थेट केंद्र सरकारकडे केली मागणी; म्हणाले, महाराष्ट्रातच नव्हे तर..
६३ चिमुकल्यांच्या मृत्यूप्रकरणात जेलमध्ये असणाऱ्या काफील खानला सपाकडून आमदारकीचे तिकीट
वडिलांनी जमीन विकून व्यवसाय करण्यासाठी दिले २० हजार, मुलाने उभी केली २४०० कोटींची कंपनी

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now