हरियाणातील पलवलमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका मुलीवर बलात्काराचा व्हिडिओ बनवून पतीला पाठवून दिल्याची बातमी समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या पीडित मुलीचे लग्न झाले होते. पतीने तो बलात्काराचा व्हिडिओ पाहिल्यानंतर पतीने पत्नीला माहेरी सोडले आहे.
त्यानंतर पीडित मुलीने याप्रकरणी पोलिस ठाण्यात धाव घेतली. तक्रार केली आणि सध्या पोलिसांनी ३ महिलांसह ५ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. तसेच पीडितीने पोलिस तक्रारीत सर्व गोष्टी उघड केल्या. सर्व हकीकत पोलिसांना सांगितली नंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
तर जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय? ही घटना आहे हरियाणातील पलवलमधील. याबाबत बोलताना पोलीस तपास अधिकारी सुमित्रा यांनी सांगितले की, एका नवविवाहित महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, 6 मार्च रोजी तिचे लग्न फरीदाबाद येथील एका तरुणाशी झाले होते.
मात्र लग्नाच्या रात्रीच सचिन नावाच्या तरुणाने बलात्काराच्या वेळी बनवलेला व्हिडिओ तिच्या पतीला पाठवला होता. व्हिडिओ पाहिल्यानंतर पतीने आईवडिलांच्या घरी पत्नीला सोडून तिला आपलं मानण्यास नकार दिला. मला तुझ्याशी काही संबंध ठेवायचे नाहीत, असे त्या तरुणाने सांगितले. पतीने तिला माहेरी सोडून दिले.
दरम्यान, याबाबत नंतर पीडित मुलीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तिने तक्रारीत म्हंटले की, ऑक्टोबर 2021 मध्ये मी मामाच्या घरी एकटी होती. त्याचवेळी सचिन अन्य दोन तरुणांसह घरात घुसला. त्यानंतर खोलीत नेऊन चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला.
तसेच आरोपी सचिनचा भावोजी विवेक, बहीण करीना आणि काजल आणि आई उषा यांनीही तिला लग्न न करण्यास धमकावले, मात्र तिने नकार दिला. धक्कादायक बाब म्हणजे बलात्कारादरम्यान तिच्यासोबत उपस्थित असलेल्या दोन्ही तरुणांनी तिचा व्हिडीओ बनवला आणि कुणाला सांगितल्यास तिला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
IPS मधून MLA बनलेल्या असीम अरूण यांनी विजयानंतर सर्वात आधी केले हे काम, लोकांनी केले कौतुक
अबब! चहावाल्याच्या खात्यावर जमा झाले ५ कोटी, १८ लाखांचे घर घेतल्यावर झाला मोठा खुलासा
या अभिनेत्रींची आई होण्याची इच्छा अजूनही आहे अपुर्ण, वाचा अभिनेत्रींचे पडद्यामागचे दु:ख
‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीची रॅम्प वॉक करतांना झाली फजिती! स्कर्टचेच तुटले बटन अन….