उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत विजय मिळवला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत इतिहास घडवणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. मागील काही दिवसांपासून नव्या सरकारच्या स्थापनेबद्दलच्या सुरू होत्या.
आता शपथविधीची तारीख निश्चित झाली असून, २५ मार्च रोजी योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर दुसरीकडे राजकीय वर्तुळात मंत्रिपदासाठी एका नावाची जोरदार चर्चा आहे. राजकारणात कोण, कुठे जाईल याचा काही नेम नाहीये.
आताच झालेल्या निवडणुकीमध्ये ओमप्रकाश राजभर भारतीय समाज पार्टी (सुभासपा) हा अखिलेश यादवांच्या सपा आघाडीत गेला होता. भाजपा विरोधात निवडणूक लढला होता. मात्र आता राजभर यांना देखील भाजपा आघाडीत सहभागी करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राजभर यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत धर्मेंद्र प्रधान, सुनील बंसल यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. याचबरोबर ओमप्रकाश यांना सुभासपाच्या कोट्यातून योगी मंत्रिमंडळात मंत्री पद दिले जाऊ शकते, असे बोलले जात आहे.
परंतु, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तसेच या संदर्भात भाजप किंवा ओमप्रकाश राजभर यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही. तर दुसरीकडे योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ २५ मार्च रोजी घेणार आहेत. २५ मार्च रोजी लखनौत शहीद पद येथील इकाना स्टेडियममध्ये शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या वेळेस भाजप सरकार बनवत आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह केंद्र सरकारचे मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, संघ आणि पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
‘द कश्मीर फाइल्स’मुळे पुन्हा वाद उफाळण्याची भीती; काश्मिरी पंडितांनी मांडलं रोखठोक मत
रंगाचा बेरंग ! सोसायटीच्या धुलिवंदनात बेधुंद होऊन नाचला, घरी पोहोचल्याच्या थोड्याच वेळात तरुणाचा मृत्यू
राष्ट्रवादी आणि एमआयएम युती करण्याच्या तयारीत? इम्तियाझ जलील आणि राजेश टोपे यांच्यात खलबतं
माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत मोठा बदल, ‘या’ दिग्गज अभिनेत्याने अचानक सोडली मालिका