एक पाय निकामी तरी छोट्या मावळ्याने सर केला रायगड, ओमकारची जिद्द पाहून राज्यभरातून होतंय कौतूक

असे म्हणतात जिद्दी पुढे नशीबालाही झुकावे लागते. याच्या अनेक घटनाही समोर आल्या आहे. आता पुण्यातील पिंपरी चिंचवडमधून असाच एक प्रकार समोर आला आहे. पिंपरी चिंचवडचा रहिवासी असलेल्या एका लहान मुलाने अपघातात एक पाय गमावलेला असतानाही रायगड किल्ला सर केला आहे.

आपल्या जिद्दीच्या जोरावर त्याने सव्वा दोन तासात रायगड किल्ला सर केला आहे. त्याला रोपवेच्या मार्गाने जाण्याबाबत शिक्षकांनी सांगितले होते. पण त्याने रोपवेचा मार्ग नाकारत संपुर्ण किल्ला पायऱ्यांनी सर केला आहे. ओमकार लकडे असे या मुलाचे नाव आहे.

ओमकार हा सहावीचा विद्यार्थी आहे. त्याने अपघातामध्ये एक पाय गमावला आहे. पण तरीही त्याने किल्ला सर करण्याची हिंमत दाखवली. ओमकार हा पिंपरी चिंचवडच्या विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थी असून २० जानेवारी रोजी त्यांच्या शाळेची सहल रायगडावर गेली होती.

ओमकारने यावेळी आपल्याला रायगडवर जायचंय अशी इच्छा व्यक्त केली. त्याची इच्छा पाहून त्याच्या पालकांनी सुद्धा संमती दिली होती. पण तो रायगड सर करेल का? असा प्रश्न शिक्षकांच्या मनात होता. पण इतर विद्यार्थ्यांसोबत बोलता बोलता त्याने सव्वा दोन तासात रायगड किल्ला सर केला.

मनात जिद्द असेल तर आपण काहीही करुन दाखवू शकतो हे ओमकारने दाखवून दिले आहे. त्याचे वय सुद्धा फक्त ११ वर्षे आहे, पण त्याने जिद्दीने रायगड किल्ला सर केला आहे. अपघातात एक पाय गमावलेला असतानाही त्याने रायगड सर केल्याने सर्वत्र त्याचे कौतूक होत आहे.

विद्यानिकेतन शाळेची सहल रायगडावर जाणार हे ठरले होते, तेव्हा ओमकारने सुद्धा रायगडावर येण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी शिक्षकांनी त्याला रोपवेने घेऊन जाऊ असे म्हटले होते. पण त्याने आपल्याला पायऱ्यांनी चढायचं असल्याची इच्छा व्यक्त केली होती.

महत्वाच्या बातम्या-
पंकजा मुंडे अमित शहांच्या कार्यालयात, भाजपच्या गोटात हालचाली, नेमकी बैठक कशासाठी?
रोहित-गिलच्या धडाक्यानंतर गोलंदाजांनी ओकली आग, किवींचा धुव्वा उडवत भारत बनला नंबर वन
हृदयविकाराच्या झटक्यापासून वाचण्यासाठी ‘ही’ दोन औषधे नेहमी ठेवा सोबत; जाणून घ्या कशी घ्यायची