जगभरात कोरोनाचा नवा विषाणू असणाऱ्या ओमायक्रॉनचे (omicron) रुग्ण आढळत आहेत. भारतातही रुग्ण वाढत असून महाराष्ट्रात शनिवारी ओमायक्रॉनची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली. नव्या 416 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामधील सर्वाधिक रुग्णसंख्या ही मुंबई महापालिका क्षेत्रात आढळली असून मुंबईमध्ये तब्बल 321 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (omicron variant alert omicron can infect the same person twice)
अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत एकाच व्यक्तीला दोनदा कोरोना संसर्ग झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली होती. अशी अनेक प्रकरणे होती ज्यात एकाच व्यक्तीला दोनदा डेल्टा संसर्ग झाला होता. त्यामुळे आताही असा प्रश्न विचारला जात आहे, की ओमायक्रॉन प्रकार एखाद्या व्यक्तीला किती वेळा संक्रमित करू शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार, ओमायक्रॉनमध्ये पुन्हा संसर्ग होण्याचा धोका डेल्टा प्रकारापेक्षा 4 पट जास्त आहे. अशा परिस्थितीत एकाच व्यक्तीला 2 वेळा ओमायक्रॉनचा संसर्ग होण्याची शक्यता सहज निर्माण होते. ओमायक्रॉन हा एक असा व्हेरिएंट आहे जो अँटीबॉडीजला चकमा देतो. मग त्या अँटीबॉडीज लसीकरणामुळे तयार झालेल्या असोत किंवा जुन्या कोरोना संसर्गामुळे तयार झालेल्या असोत याची लागण पुन्हा होऊ शकते.
दरम्यान, देशात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा समूह संसर्ग सुरू झाला आहे आणि त्याचवेळी ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2 भारतातील अनेक भागांत फैलावला असल्याची माहिती समोर आली आहे. चिंतेत भर घालणारी ही माहिती भारताच्या सार्स कोव्ह-२ जीनोमिक्स कन्सोर्टियम यांनी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये देण्यात आली आहे.
ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे भारतात कोरोना संसर्गाची तिसरी लाट धडकली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झापट्याने वाढू लागली आहे. गेल्या 24 तासांत देशात 3 लाख 6 हजार 64 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर देशातील दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या शहरांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील रुग्णसंख्येच्या पीकचा टप्पा पार केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘पुष्पा’च्या यशानंतर शरद केळकरने व्यक्त केली भिती; म्हणाला, आपण आपलं मुळ विसरतोय त्यामुळं..
CID मधील ACP प्रद्युमन यांना मिळेना काम; म्हणाले, हे माझं दुर्भाग्य आहे की मी घरी बसून..
VIDEO: श्रेयस तळपदेची एअरपोर्टवर धाकड एन्ट्री; म्हणाला, ‘पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या?’
पुष्पा पाठोपाठ अल्लू अर्जुनचे हिंदीतील आणखी ६ चित्रपट बाॅलीवूडमध्ये धुमाकूळ घालणार, पहा यादी..