मायानगरी मुंबईत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील अंधेरी परिसरात एका 89 वर्षीय व्यक्तीने पत्नी आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे. दोघींच्या आजारपणाने त्रस्त झालेल्या वृद्धाने झोपेतच दोघींची हत्या केल्याचे पोलिसांनी सोमवारी सांगितले. एवढेच नाही तर घटनेनंतर त्याने संपूर्ण रात्र मृतदेहासोबत खोलीतच काढली.(old-man-flat-closed-after-killing-sick-wife-and-daughter)
पुरुषोत्तम सिंग गंधोक यांनी रविवारी रात्री शेर-ए-पंजाब कॉलनीतील एका घरात त्यांची 81 वर्षीय पत्नी कमलजीत सिंग आणि 55 वर्षीय मुलीची हत्या केली, असे मेघवाडी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले. हत्येनंतर त्याने फ्लॅटला आतून कुलूप लावून मृतदेहासोबत संपूर्ण रात्र काढली आणि सोमवारी सकाळी मोठ्या मुलीला फोन करून घटनेची माहिती दिली, असे पोलिसांनी सांगितले.
मुलगी घरी पोहोचल्यावर गंधोकने खोली उघडण्यास नकार दिला आणि मुलीला आधी पोलिसांना बोलवायला सांगितले, असे अधिकाऱ्याने सांगितले. पण मुलीने त्याला पटवून दार उघडले. खोलीत गंधोक यांच्या पत्नीचे आणि त्यांच्या अविवाहित व मानसिकदृष्ट्या अस्वस्थ मुलीचे रक्ताने माखलेले मृतदेह पडले होते.
आरोपीने सांगितले की दोघीही अनेक वर्षांपासून विविध आजारांनी त्रस्त होते आणि तो त्यांचा त्रास यापुढे सहन करू शकत नाही, म्हणून त्यांची हत्या केली, असे अधिकाऱ्याने सांगितले. हत्येप्रकरणी आरोपी ज्येष्ठाला अटक करून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.