लग्नात आनंदाने नाचणाऱ्या एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर देखील तुफान व्हायरल होतं असून अनेकांना हा व्हिडिओ पाहताना जबर धक्का बसला आहे.
वाचा नेमकं घडलं काय..? ही घटना उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात घडली असल्याची माहिती मिळत आहे. राम निवास गिरी असे या मृत तरुणाचे नाव आहे. तसेच या प्रकरणी भटनीचे अधिकारी संतोष कुमार सिंह यांनी माहिती सांगितली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘नाचताना पडल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.’
त्याचं झालं असं.. राम निवास गिरी हे 11 जून रोजी मानसिंग यांच्या मुलाची वरात भाटपारराणीच्या बंगरा बाजार येथे गेले होते. त्यावेळी तिथे दारातच तरुण आणि इतर वरातीतील लोक ऑर्केस्ट्रामध्ये बेभान होऊन मोठ्या आनंदात नाचत होते. राम निवास गिरी यांना देखील नाचण्याचा मोह आवरला नाही.
आनंदाच्या भरत तेही पिकअप गाडीवर चढले आणि डान्सरसोबत मोठ्या आनंदात डान्स करू लागले. मात्र पुढे होत्याचं नव्हतं झालं. अचानक त्यांचा हात सुटला आणि काही मिनिटात ते जमिनीवर कोसळले. त्यांना कोसळलेल पाहून नातेवाईकांना देखील जबर धक्का बसला.
त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. राम निवास गिरी हे अविवाहित होते. त्यांच्या अचानक मृत्युने कुटुंबियांवर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. याचबरोबर परिसरात देखील हळहळ व्यक्त केली जातं आहे.