अलीकडे राज्यात अनेक धक्कादायक घटना घडताना पाहायला मिळत आहे. अशीच एक धक्कादायक घटना आता अमरावतीमधून समोर येत आहे. एका शुल्लक कारणावरून दारुड्या मुलाने बापाचा जबर मारहाण केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातच बापाला तडफडून मृत्यू झाला.
पोलिसांनी या घटनेची तात्काळ दखल घेत मुलाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत मुलाला अटक केली आहे. या घटनेने कुटुंबियावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात देखील हळहळ व्यक्त केली जातं आहे. जाणून घ्या नेमकं त्या दिवशी घडलं काय..?
ही धक्कादायक घटना अमरावती येथे घडली आहे. भुलजी रामजी ठाकरे (वय ५५) असे मृत बापाचे, तर मनोहर भुलजी ठाकरे (वय २६) असे मारेकरी मुलाचे नाव आहे. सोमवारी ही घटना घडली आहे. मनोहर प्रचंड व्यसनाच्या अहरी गेला होता. त्यातूनच हा धक्कादायक प्रकार घडल्याच उघडकीस आलं आहे.
सोमवारी रात्री वडील भुलजी रामजी ठाकरे हे अंगणात बसले होते. त्यावेळी मनोहर मद्यधुंद अवस्थेत घरी आला. घरी आल्यावर त्याने आई इमला यांना स्वयंपाक झाला नाही का? असे विचारले. त्यावर आईने मनोहरला सांगितले की, ‘स्वयंपाक व्हायचा आहे, थोड थांब,’ असं आई इमला म्हणाल्या.
त्यावर वडिलांनी देखील मनोहरला थोडे थांबण्यास सांगितले. मात्र मद्यधुंद अवस्थेतील मनोहरला याचाच राग आला. त्याला इतका राग आला की मद्यधुंद अवस्थेत त्याने लाकडी फळीने हल्ला चढवला. या जबर हल्ल्यात भुलजी बेशुद्ध होऊन काही मिनिटात जमिनीवर कोसळले.
दरम्यान, काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. घाबरलेल्या इमलाने या घटनेची तात्काळ माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनस्थळी जाणून भेट दिली. त्यांनंतर इमला यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मनोहर ठाकरेविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. मात्र मनोहर हा सध्या फरार असल्याची माहिती मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मविआतील वाद चव्हाट्यावर, शिवसेनेकडून काँग्रेसची पिळवणूक, वॉर्ड पुर्नरचनेवरून केले गंंभीर आरोप
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा बाईसोबत रुममध्ये आढळला, पत्नीने व्हिडीओ काढून केला व्हायरल
मृत्यूनंतर पाठीमागे ‘इतक्या’ कोटींची संपत्ती सोडून गेला केके; एका गाण्याचे मानधन ऐकून डोळे पांढरे होतील
हार्टअटॅकआधी केकेला जाणवली होती ‘ही’ लक्षणे, तुम्हीही ‘या’ ७ लक्षणांकडे कधीच नका करु दुर्लक्ष