भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर गेल्या वर्षी प्रथमच लिलावात सहभागी झाला होता. अर्जुनला गेल्या वर्षी अन्य कोणत्या संघांनी बोली लावली नव्हती. या वर्षी देखील असेच होईल असे वाटले होते. पण प्रत्यक्षात झाले उटले. यावेळी त्याच्यासाठी आणखी एका संघाने उत्सुकता दाखवली आहे.
सचिन तेंडुलकर आयपीएलच्या सुरुवातीपासून मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. मुंबई इंडियन्सने 2014 साली सर्वप्रथम आयपीएलचे विजेतेपद मिळवले आणि सचिनने आयपीएलमधून निवृत्ती घेतली. सचिन निवृत्तीनंतर मैदानावर खेळत नसला तरी मुंबईचा मार्गदर्शक म्हणून नेहमी संघासोबत असतो. सचिननंतर मुलगा अर्जुन तेंडुलकर देखील मुंबई इंडियन्स संघाचा प्रथम नेटमधील गोलंदाज म्हणून होता.
गेल्या वर्षी अर्जुन तेंडुलकर प्रथमच लिलावात सहभागी झाला होता. अपेक्षे प्रमाणे मुंबईने त्याला 20 लाख या बेस प्राईसला संघात दाखल करून घेतले. अर्जुनला गेल्या वर्षी अन्य कोणत्या संघांनी बोली लावली नव्हती. या वर्षी देखील असेच होईल असे वाटले होते. मात्र, यंदाच्या लिलावात अर्जुन तेंडुलकरसंदर्भात एक गोष्ट सकारात्मक घडली. मुंबई इंडियन्सशिवाय अन्य फ्रेंचायझीने त्याच्यात रस दाखवला.
आयपीएलच्या रिंगणात पहिल्यांदाच मैदानात उतरण्यास सज्ज असेलेल्या गुजरात टायटन्सने त्याच्यावर बोली लावली. आयपीएलमध्ये नव्याने दाखल झालेल्या गुजरात टायटन संघाने अर्जुनवर 25 लाखांची बोली लावली. यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले. मुंबई संघाचे मालक आकाश अंबानी गुजरातच्या टेबलकडे पाहून हसू लागले. अखेर मुंबईनेच 30 लाखात त्याला आपल्या संघात घेतले.
अर्जुन हा अष्टपैलु खेळाडू आहे. गेल्या वर्षी जखमी झाल्याने अर्जुनला मुंबई इंडियन्सकडून एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. सचिन तेंडुलकर हा देखील आयपीएल सुरु झाल्यापासूनच मुंबई इंडियन्स संघासोबतच जोडला गेला आहे.
त्यामुळे मुंबई इंडियन्स संघासोबत व संघ व्यवस्थापनासोबत सचिनचे जवळचे संबंध असल्याने अर्जुनला मुंबई इंडियन्स रिलीज करण्याची शक्यता कमीच होती. त्यामुळे चाहत्याच्या अंदाज खरा ठरला आणि अर्जुन मुंबई इंडियन्स संघाचा पुन्हा एकदा भाग झाला आहे. मात्र, या आयपीएलच्या सामन्यात खेळणार का नाही. याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.