Share

अरे देवा! वडिलांच्या मृत्यूनंतर तीन वर्षांच्या चिमुकलीवर आली कुटुंबाची जबाबदारी, वाचा नेमकं काय घडलं..

वयाचं तिसरं वर्ष हे सर्वांसाठीच खेळण्याचं, बागडण्याचं असतं. ते वय निरागस असतं. कोणत्याही प्रकारची जबादारी मुलांवर नसते. मात्र, आता एक अशी घटना समोर आली आहे, जी वाचून तुम्हांला धक्का बसेल. एका तीन वर्षांच्या मुलीवर एवढ्या कोवळ्या वयात कुटुंबाची जबाबदारी आली आहे.

राजधानीतील बागरूजवळील मोहनपुरा गावात असा ‘पगडी विधी’ झाला की तिथे उपस्थित कोणालाही आपले अश्रू आवरता आले नाहीत. हा विधी असा होता की, जेव्हा काही पंच पटेलांनी तीन वर्षांच्या निष्पाप मुलीच्या डोक्यावर फेटा बांधला तेव्हा तेही भावूक झाले आणि म्हणाले, अरे देवा! असा फेटा कोणाच्याही डोक्यावर बांधू नये.

मोहनपुरा येथील वडिलांच्या मृत्यूनंतर समाजातील पंच पटेलांनी तीन वर्षांच्या निष्पाप मुलीच्या डोक्यावर फेटा बांधून तिच्यावर कुटुंबाची जबाबदारी सोपवली. बागडण्याच्या, खेळण्याच्या, उड्या मारण्याच्या वयात मुलीच्या डोक्यावर फेटा बांधला गेला तेव्हा लोकांच्या डोळ्यात पाणी आले.

माहितीनुसार, मोहनपुरा येथे सुनील टोडावता नामक व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झाला. त्यांना मुलगा नव्हता आणि ‘अनम’ ही फक्त तीन वर्षांची मुलगी होती. पंच पटेलांनी अनमला पगडीचा विधी करायला बसवले. यानंतर समाजातील लोकांनी कुटुंबीय व नातेवाईकांच्या उपस्थितीत विधी पार पाडला.

यावेळी राजस्थान सरपंच संघाचे अध्यक्ष बंशीधर गढवाल, अनमचे आजोबा रामफूल शेरावत, आजी, माजी नगरसेवक गीता चौधरी शेरावत, माजी युवक काँग्रेसचे अध्यक्ष बागरू अशोक शेरावत, रामलाल शेरावत, जगदीश शेरावत, आजोबा रामपाल हरलदाल, प्रताप हरलदाल, आजोबा नराधम शेरावत आदी उपस्थित होते. .

या विधी बद्दल सांगायचं झाल्यास, ही एक सामाजिक प्रथा आहे ज्याचे पालन हिंदू, शीख यांच्यासह सर्व धार्मिक समुदाय करतात. या प्रथेनुसार, कुटुंबातील ज्येष्ठ पुरुषाच्या मृत्यूनंतर, पुढच्या सर्वात मोठ्या जिवंत मुलाच्या डोक्यावर विधीपूर्वक पगडी बांधली जाते.

पगडी हे या भागातील समाजात आदराचे प्रतीक आहे, हे त्यांच्या संस्कृतीतून दिसून येते. ज्याच्या डोक्यावर पगडी बांधली जाते, ती कुटुंबाच्या सन्मानाची आणि कल्याणाची जबाबदारी असते. पगडीचा विधी कुटुंबातील व्यक्तीच्या अंतिम संस्काराच्या चौथ्या दिवशी किंवा तेराव्या दिवशी केला जातो.

इतर

Join WhatsApp

Join Now