यंदाचा दसरा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट घेणार की उद्धव ठाकरे यावरुन दोन्ही गटांमध्ये नवी ठिणगी पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर शिवसेनेची ओळख असेलला दसरा मेळावा हायजॅक करण्याचा प्रयत्न शिंदे गटाचा आहे. मात्र अद्याप शिवसेनेच्या या मेळाव्याला परवानगी अद्याप मिळालेली नाही.
तसेच मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने मुंबई मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र महापालिकेने हात आखडता घेतला असल्याच पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता संधी शिवसेनेला मिळणार, की एकनाथ शिंदे गटाला याविषयी उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे.
आदित्य ठाकरे आक्रमक..!
माध्यमांशी बोलताना पुढे आदित्य ठाकरे यांनी म्हंटलं आहे की, ‘दसरा मेळावा शिवसेनेचा असतो आणि शिवसेनेचाच राहणार..! मेळाव्याच्या परवानगीसाठी आम्ही सतत प्रयत्न करतोय, पण तुम्हाला माहित आहे जे गद्दार सरकार आलंय ते दडपशाहीचं सरकार त्यामुळे त्यांनी परवानगी दिली नाही. शिवतीर्थावर शिवसेनेचाच दसरा मेळावा आहे’
दरम्यान, शिवसेनेने शिवाजी मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मागीतली आहे. मात्र, मुंबई महापालिकेने अद्याप याला मंजूरी दिलेली नाही. त्यामुळे आता हा सोहळा ही शिंदे हाय जॅक करणार अशी चर्चा आहे. यामुळे दसरा मेळावा नक्की कोणाचा होणार शिंदे गट की उद्धव ठाकरे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Jharkhand : आता झारखंडमध्येही काय झाडी काय डोंगर! मुख्यमंत्र्यांसह ३६ आमदार झाले नॉट रीचेबल
Shivsena : झंडूबाम घेऊन ठेवा कारण तुमची.., शिवसेनेसोबत युती केल्यानंतर संभाजी ब्रिगेडचा भाजपला इशारा
शिवसेनेतील दोन आमदार शिंदे गटाच्या गळाला; ‘या’ मंत्र्याच्या दाव्याने मोठी खळबळ
रात्रीच्या बैठका घेतात, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, संभाजीराजेंविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक