शरद पोंक्षे हे मराठी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेते आहेत. मराठी चित्रपट क्षेत्रातील एक प्रतिभावंत कलाकार म्हणून शरद पोंक्षे ओळखले जातात. नाट्यसृष्टी बरोबरच चित्रपट सृष्टीतही शरद पोंक्षे यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
विनोदी, गंभीर, नायक, खलनायक तसेच अतिशय संवेदनात्मक अशा सर्व तऱ्हेच्या भूमिका यशस्वीरित्या साकारणारे अभिनेते म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यामुळे त्यांना मानणारा एक वेगळा वर्ग आहे. शरद पोंक्षे हे सतत सोशल मीडियावर रोखठोकपणे आपलं मतं मांडताना दिसतात.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे काल ठाण्यात भाषणा झाले. या भाषणाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. आता यासंबंधीच एक पोस्ट नुकतीच अभिनेते शरद पोंक्षे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून राज यांच्या भाषणावरील प्रतिक्रिया म्हणुन पोस्ट केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.
अभिनेते शरद पोंक्षे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की,
‘वा राजसाहेब वा’ आम्ही भारतीय आज सुखावलो, बऱ्याच काळाने एक जबरदस्त विचार, विशेषतः मतपेटीचा विचार न करता निर्भयपणे आमच्या मनातले विचार मांडलेत धन्यवाद.’,
सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर खुप व्हायरल होतेय. अनेकांनी कमेंट्स बॉक्समध्ये आपली त्यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे. त्यांच्या या पोस्टला बरेच लाईक्सदेखील आलेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्याच्या ‘उत्तर’सभेत काल त्यांच्यावर टीका करणाऱ्या सर्वच विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं. राज ठाकरे यांनी या सभेत राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे काढण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की,
प्रत्येकाने आपल्या धर्माचे पालन घरात केले पाहिजे. महाराष्ट्रात आम्हाला जातीय दंगली करायच्या नाहीत; परंतु राज्याच्या गृह खात्याने सर्व मौलवींना बोलावून मशिदींवरील भोंगे ईदपूर्वी ३ मेपर्यंत उतरवायला भाग पाडावे. तसे झाले नाही तर जेथे भोंगे सुरू असतील तेथे हनुमान चालीसा वाजवली जाईल. माझ्या भात्यात आणखीही बाण आहेत. मला ते बाहेर काढायला लावू नका.
महत्वाच्या बातम्या
राज ठाकरेंचा ‘हिंदुजननायक’ असा उल्लेख करत काश्मिरी पंडितांकडून बॅनरबाजी, जम्मूत सभेचे थेट प्रक्षेपण करणार
मेहंदी रंगली नवरी सजली! पहा शिवानी आणि विराजसच्या मेहंदी सोहळ्याचे खास व्हिडिओ
“महाराष्ट्राच्या मातीविरोधात जास्त बोलू नका, अन्यथा महिला लाटणे घेऊन मागे लागतील”
तुमच्या स्मार्टफोनचा इंटरनेट स्पिड स्लो आहे का? ‘या’ खास ट्रिक्स वापरा अन् वाढवा तुफान स्पिड