Share

काॅंग्रेस देणार गरीबांना न्याय; महीन्याला ६ हजार रूपये मोफत देण्याचा राहूल गांधींचा शब्द

rahul gandhi

गोवा निवडणुकीच्या प्रचाराला (Goa Elections 2022) आता चांगलाच रंग चढला आहे. काही दिवसातच मतदान पार पडेल. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचारतोफा धडाडत आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत काँग्रेसचे नेते राहुल (Rahul Gandhi) गांधी थेट मैदानात उतरलेले पाहायला मिळाले.

गोव्यात सत्तेत येण्यासाठी काँग्रेस जोमाने कामाला लागली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या गोव्यात प्रचार करत आहे. सध्या गोवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात घोषणांचा चांगलाच पाऊस पडताना दिसत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाचा जाहीरनामा सादर केला.

‘आम्ही गोव्यामध्ये सरकार स्थापन केल्यावर ‘न्याय’ योजना राबवणार आहोत, ज्याच्या अंतर्गत प्रत्येक गरीब कुटुंबाला वार्षिक ७२ हजार रुपये मिळतील.’’ असे ते म्हणाले. साखळी येथे झालेल्या सभेत राहुल गांधी बोलत होते. तर जाणून घेऊ या नेमकी ‘न्याय’ योजना काय आहे?

2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत काँगेसने न्याय योजनेच काँगेसने आश्वासन दिलं होतं. देशातल्या गरीब व्यक्तींना दर महिना किमान 12 हजार रुपये उत्पन्नाची हमी मिळायला हवी, या विचारातून ही योजना साकार झाली आहे. या योजनेचा गरिबांना चांगलाच फायदा होणार आहे.

तसेच याबाबत सरकारच्या एका आकडेवारीनुसार, देशात 5 कोटी कुटुंब, 25 कोटी लोक हे दारिद्र्यरेषेखाली राहतात. त्यांचं सरासरी उत्पन्न हे महिना अवघं सहा हजार रुपये आहे. ही आकडेवारी लक्षात घेऊन त्यांना दरमहिना सहा हजार रुपये आणि वर्षाला 72 हजार रुपये मदत देण्याची ही योजना आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अमित शाह यांनी गोव्यात दाखल होत काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा समाचार घेतला होता. “गोव्यातील लढत ही प्रामुख्याने काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच आहे. गोवेकर जनतेने आपले मत वाया घालवू नये, सत्तेत कोण यावं हे आता गोवेकरांनी ठरवावं.’ असे म्हणत राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘आपकी इज्जत एक बार गई तो गई, हम तो रोज रातको बेचतेही है, खतम ही नही होती’
भयानक! हिजाब घातला म्हणून महाविद्यालयात प्रवेश नाकारला; विद्यार्थीनींची कोर्टात धाव
“वारकरी संप्रदायात काही संघ भक्त परायण घुसले असून,कितीही दडवले तरी बोलण्यातून त्यांची चड्डी दिसतेच.”
भाजप आमदाराच्या सुनेने पतीवर केले गंभीर आरोप; म्हणाली, ‘माझा सेक्स स्लेव्ह म्हणून …’

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now