बॉलिवूडमध्ये दोन सुपरस्टार एकत्र काम करणे हे काय नवीन नाही. मात्र सध्या अशी एक जोडी आहे जी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहे. ती जोडी म्हणजे अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी. हे दोन कलाकार एकाच चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या दोघांचा हा पहिलाच चित्रपट आहे.
हे दोघे ‘सेल्फी’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. २०१९ मध्ये मल्याळम चित्रपट ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. याच चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. तसेच या चित्रपटाची घोषणा झाली, तेव्हा चित्रपटाचा एक लुक समोर आला. ज्यामध्ये अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी बाइकवर बसले आहेत आणि सेल्फी घेत आहेत.
त्याचबरोबर या चित्रपटाचा आणखी एक नवीन अपडेट समोर आला आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, या चित्रपटात एका अभिनेत्रीची देखील एंट्री झाली आहे. ती अभिनेत्री म्हणजे नुसरत भरुचा ही आहे. या चित्रपटात ती महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. तिच्या भूमिकेची आणखी माहिती समोर आली नाही. मात्र असे म्हंटले जात आहे की, लवकरच तिच्या भूमिकेची संपूर्ण माहिती समोर येईल.
अक्षय कुमार आणि नुसरत भरुचा हे दुसऱ्यांदा एकत्र काम करणार आहेत. तसेच ‘राम सेतू’ या चित्रपटात दोघेही एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट ऑक्टोंबर २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत नुसरत भरुचा आणि जॅकलीन फर्नांडिस देखील असणार आहे.
तर ‘राम सेतू’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा करणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी नुसरत नुकतीच हैदराबादलाही गेली होती. अजूनही या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. त्याचबरोबर चाहते देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांवर आपली कशी जादू करेल हे पाहण्यासारखे आहे.
नुसरतच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती या चित्रपटाव्यतिरिक्त आणखी चित्रपटात दिसणार आहेत. मात्र काही दिवसांपूर्वीच तिने मुंबईतील ‘जनहित में जरी’ या चित्रपटाच्या डबिंगमधून माघार घेतली आहे. तसेच याच्याशिवाय नुसरत ‘हुडदंग’ या चित्रपटातही दिसणार आहे.
तसेच अक्षय कुमारच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो ‘पृथ्वीराज’, ‘बच्चन पांडे’, ‘रक्षा बंधन’, ‘ओएमजी २’ आणि ‘राम सेतू’ या चित्रपटात दिसणार आहे. तर इमरान हाश्मी या अगोदर ‘चेहरे’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि रिया चक्रवर्ती देखील मुख्य भूमिकेत दिसले होते.