बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा (Nushrat Bharucha) सध्या तिच्या आगामी ‘जनहित में जारी’ या चित्रपटामुळे माध्यमात चर्चेत आहे. या चित्रपटात नुसरतने एका कंडोम विकणाऱ्या मुलीची भूमिका साकारली आहे. तसेच चित्रपटात ती कंडोम विकत लोकांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण करण्याचे काम करते.
हा चित्रपट १० जून रोजी प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी नुकतीच या चित्रपटाचा पोस्टर आणि टीझर प्रदर्शित करण्यात आला. नुसरतनेही तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर या चित्रपटासंबंधित दोन पोस्टर शेअर केले होते. परंतु हे पोस्टर समोर येताच नुसरत भरूचाला प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.
https://www.instagram.com/p/CdC0C2-tz9w/
नुसरतने जे पोस्टर शेअर केले आहेत त्यावर लोक अश्लील कमेंट करत आहेत. काहीजण हा चित्रपट डी-ग्रेड असल्याचे म्हणत आहेत. तर काहींचे म्हणणे आहे की, या चित्रपटाची कथा खरी नाही. कारण कोणतीच मुलगी बाजारात जाऊन अशी कंडोमची विक्री करत नाही. सोशल मीडियावर होणारा हा ट्रोलिंग पाहता नुसरतने एक व्हिडिओ शेअर करत ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.
https://www.instagram.com/p/CdDQaLTNrWs/
नुसरतने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये नुसरतने तिला ट्रोल करण्यात येणाऱ्या लोकांचे स्क्रीनशॉट काढून या व्हिडिओत दाखवले आहेत. व्हिडिओत नुसरत म्हणत आहे की, ‘या चित्रपटात मी कंडोमचा प्रचार करत असलेले दिसत आहे. परंतु, या गोष्टीचा लोकांनी वेगळाच अर्थ काढला आहे’.
‘सामान्यपणे लोक त्यांच्या प्रोफाईलद्वारे चांगले कमेंट्स शेअर करतात. परंतु, मला ज्या पद्धतीने घाणेरडे कमेंट्स मिळत आहेत त्यानंतर मला वाटलं की ते कमेंट्स तुमच्यासोबत शेअर करावं’. पुढे व्हिडिओत नुसरत तिच्या पोस्टवर मिळालेले कमेंट्स व्हिडिओद्वारे दाखवते. त्यानंतर म्हणते की, ‘बस केवळ हेच विचार बदलायचे होते. काही हरकत नाही. तुम्ही बोलत राहा मी तुम्हाला उत्तर देत राहिन’.
नुसरतच्या या व्हिडिओनंतर अनेक नेटकरी तिला पाठिंबा देत आहेत. एकाने तिच्या या व्हिडिओवर कमेंट करताना लिहिले की, ‘तुम्हाला आणि प्रत्येक महिलेला अधिक पॉवरची गरज आहे’. दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘या लोकांची नावे लपवू नका. लोकांनाही कळू द्या की, आजकाल अशिक्षित लोकसुद्धा इन्स्टाग्राम वापरत आहेत. पण कंडोम नाही वापरत. आणि जशी त्यांची बुद्धी त्याप्रमाणे त्याचा वापर करत आहेत’.
महत्त्वाच्या बातम्या :
गजनी चित्रपटात गजनी धर्मात्माची भूमिका साकारणारे प्रदीप रावत कुठे गायब झालेत?
शेवंता अर्थात अपूर्वा नेमळेकरची आई राहते अत्यंत साधी; फोटो पाहून तुम्हीही कौतुक कराल
बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला रामचरणचा ‘हा’ चित्रपट, डिस्ट्रीब्यूटर्सनी मागितली 50 कोटींची भरपाई