Share

ज्यांच्या नावे १०० कोटींची खंडणी वसूल केली जात होती तो नंबर १ म्हणजे ‘हा’ माणूस; न्यायालयात खुलासा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भ्रष्टाचारप्रकरणी अटक झाली होती. तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून माहिती दिली होती. त्यानंतर सीबीआयने व पुढे ईडीने आरोपपत्र दाखल करत देशमुख यांना अटक केली. अजूनही देशमुख कैदेतच आहेत. अनिल देशमुख यांनी जामीन अर्ज केलाय. त्या संदर्भात एक अपडेट समोर येत आहे. (Number 1 in whose name the extortion of 100 crores was being collected was ‘this’ man; Disclosure in court)

नंबर १’ साठी पैसे हवे आहेत, असे म्हणत मुंबईतील रेस्टॉरंट अँड बार मालकांकडून कोट्यावधीची रक्कम तत्कालीन पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी वसूल केली. परंतु सचिन वाझे यांनी उल्लेख केलेला नंबर १’ देशमुख नाही तर परमबीर सिंग आहेत, असा जबाब अनेक साक्षीदार पोलीस तसेच रेस्टॉरंट अँड बार मालकांनी देखील नोंदवला आहे, अशा प्रकारचा दावा अनिल देशमुखांकडून न्यायालयात करण्यात आला आहे.

अनिल देशमुख यांनी ॲड.अनिकेत निकम यांच्यामार्फत न्यायालयात जामीन अर्ज केला. त्यावर न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या समक्ष ज्येष्ठ वकील विक्रांत चौधरी यांनी अनिल देशमुखांची बाजू मांडली.

युक्तीवादात म्हंटले की, बार आणि रेस्टॉरंट मालकांकडून ४ कोटी ७० लाख इतकी रक्कम वसूल करून माझ्यापर्यंत पोहोचवण्यात आली. त्यानंतर बनावट कंपन्यांमार्फत ती आमच्या नागपूरमधील ट्रस्टकडे वळविण्यात आली. आरोपपत्र दाखल करताना १ कोटी ७१ लाख असा आकडा ईडीने दाखवला आहे.

ही रक्कम मात्र माझ्याकडे कोणाकडून आली? व माझ्याकडून कोठे गेली? याबाबत ईडीला काहीही सांगता आले नाही. तसेच जैन बंधूंच्या बनावट कंपन्यांमार्फत आमच्या खात्यात जे पैसे आले, त्या रकमेस मनी लॉन्ड्रीग प्रकरण दाखवून आमच्यावर ईडीने गुन्हा नोंदवला.

खरंतर त्या रकमा सीएसआर फंडाअंतर्गत आलेल्या वैद्य रकमा आहेत असे जैन बंधूंनी त्यांच्या जबाबात म्हंटलं आहे, असा सर्व युक्तिवाद अनिल देशमुख यांच्याकडून करण्यात आला. यानंतर आता ईडीकडून अनिल सिंग आपला युक्तिवाद मांडणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
ब्रेकींग न्युज! शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक; ईडीची मोठी कारवाई
ठाणे शहरात लागलेल्या बॅनरमुळे राजकीय वर्तूळात खळबळ; आनंद दिघेंच्या हत्येबाबतचा उल्लेख
कालच शिंदेगटात गेलेल्या खोतकरांवर रामदास कदमांचा हल्ला; खोतकरांनी पैसै खाल्लेत म्हणून ते घाबरत आहेत..

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now