उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. शुक्रवारी त्यांनी गोरखपूर शहरातून उमेदवारीचा फॉर्म भरला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे.(Now Yogi Adityanath has become a millionaire)
यामध्ये त्यांनी १.५४ कोटी संपत्ती असल्याचे सांगितले आहे. त्याचसोबत योगी आदित्यनाथ यांनी आपल्यावर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्री योगी यांच्या प्रतीज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे एकूण १ कोटी ५४ लाख ९४ हजार ५४ रुपयांची संपत्ती आहे असे सांगितले आहे. यामध्ये १ लाख रोख रक्कम आहे.
यापूर्वी २०१७ मध्ये योगी आदित्यनाथ यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांनी आपली संपत्ती ९५.९८ लाख रुपये असल्याची जाहीर केले होते. पाच वर्षांमध्ये योगींच्या संपत्तीत ६० लाख रुपयांची वाढ झाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे दिल्ली, लखनऊ आणि गोरखपूरमधील ६ ठिकाणी वेगवेगळ्या बँकांमध्ये ११ खाती आहेत.
या खात्यांमध्ये १ कोटी १३ लाख ७५ हजार रुपयांहून अधिक रक्कम जमा केली आहे. योगी आदित्यनाथ यांच्याकडे जमीन किंवा घर नाही. परंतु राष्ट्रीय बचत योजना आणि विमा पॉलिसींद्वारे त्यांच्याकडे ३७.५७ लाख रुपये आहेत. योगी आदित्यनाथ यांच्याकडे ४९ हजार रुपयांचे सोन्याचे कुंडल आहे. त्याचे वजन २० ग्रॅम आहे.
तसेच योगी आदित्यनाथ यांच्या सोन्याच्या साखळीत रुद्राक्षाची माळ घातली आहे, ज्याची किंमत २० हजार रुपये आहे. या साखळीचे वजन १० ग्रॅम आहे. याशिवाय, त्यांच्याकडे १२ हजार रुपयांचा मोबाईलही आहे. दरम्यान, गेल्या वेळी योगी आदित्यनाथ यांनी सांगितले होते की, त्यांच्याकडे दोन कार आहेत, पण यावेळी त्यांच्याकडे एकही कार नाही.
योगी आदित्यनाथ आपल्याजवळ शस्त्रेही ठेवतात. त्याच्याकडे एक लाख रुपये किमतीचे रिव्हॉल्व्हर आणि 80 हजार रुपये किमतीची रायफल आहे. योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत. ५ जून १९७२ मध्ये योगीचा जन्म झाला होता. योगीनी वयाच्या २६व्या वर्षी पहिली निवडणूक लढवली होती.
महत्वाच्या बातम्या
इमारतीला धडकून झाला ३४ पक्ष्यांचा मृत्यु, धक्कादायक व्हिडिओ आला समोर
पुण्यात जबर राडा..! शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पडले पायरीवर, व्हिडिओ तूफान व्हायरल