दूरसंचार कंपन्यांमधील वाढत्या स्पर्धेदरम्यान भारती एअरटेल कंपनीने आपला नवीन व्यवसाय सुरू केला आहे. आता एअरटेल कंपनी तुमच्याकडून महिन्याला फक्त 99 रुपये घेऊन तुमच्या घरावर नजर ठेवणार आहे. हे ऐकल्यानंतर नक्कीच तुमचा गोंधळ उडाला असेल. पण, नेमका हा प्रकार काय याबद्दल आम्ही सविस्तर माहिती देणार आहोत.
आता एअरटेल ग्राहकांना फक्त 99 रुपयात एक खास सर्विस देत आहे, ज्याद्वारे तुम्हाला तुमचे घर सुरक्षित ठेवता येईल. एअरटेलकडे प्रोडक्ट्सची मोठी रेंज आहे, यापैकीच एक Airtel Xsafe आहे. कंपनीच्या या सर्विसचा उद्देश यूजर्सला अधिक सुरक्षितता प्रदान करणे आहे.
यासाठी यूजर्स एअरटेलचा कॅमेरा खरेदी करून या सर्विसचा फायदा घेऊ शकतात. ऑफिस आणि घराच्या सुरक्षेसाठी आपण अनेक कॅमेरे वापरत असतो. मात्र, याचा खर्च अधिकच असतो. अशा स्थितीत एअरटेलची ही भिन्नट सर्विस तुमच्यासाठी नक्कीच फायद्याची ठरेल.
या Airtel Xsafe चे काही खास फीचर्स आहेत, ते म्हणजे, यामध्ये फुल एचडी व्हिडिओ,पर्सन डिटेक्शन, टू-वे टॉक, क्लाउड स्टोरेज, रेकॉर्ड लाईव्ह, लाइफटाइम कॉल आणि फील्ड सपोर्ट, व्हिडिओ डाउनलोड अँड शेअर, पेरामीटर झोनिंग, मोशन डिटेक्शन, मोशन सेंसिटिव्हिटी कंट्रोलआणि इन-बिल्ट डिव्हाइस अलार्मचा समावेश आहे. यामुळे घरात कोणी प्रवेश करत असेल तर लगेच कॅमेरा अलार्म देखील लावेल.
भारती एअरटेलकडून Xsafe अंतर्गत तीन कॅमेरे सादर केले जातात. स्टिकी कॅम 2,499 रुपयात येतो व या लिस्टमधील सर्वात स्वस्त कॅमेरा आहे. तर 360 डिग्री कॅमेरा आणि एक अॅक्टिव्ह डिफेन्स कॅमेऱ्याची क्रमशः किंमत 2,999 रुपये आणि 4,499 रुपये आहे.
या कॅमेरासाठी इंटरनेट ची गरज असते. जर एअरटेलचे एक्सस्ट्रीम फायबर कनेक्शन घेतले तर कॅमेरा सतत काम करत राहील. तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर जावून एक्सस्ट्रीम फायबर सेवा तुमच्या क्षेत्रात आहे की नाही हे तपासू शकता. तसेच, Airtel Xsafe ची अतिरिक्त माहिती देखील कंपनीच्या वेबसाइटवर मिळेल.