Share

आता रोहीत पवार ईडीच्या निशाण्यावर येणार? बारामती ॲग्रो संदर्भात भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य

सध्या भाजप नेते मोहित कंबोज यांच्या विधानाने विरोधकांची झोप उडाली आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली तेव्हापासून भाजप नेते मोहित कंबोज हे राष्ट्रवादीवर निशाणा साधत आहेत. त्यानंतर आता विधानसभा अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी मोहित कंबोज यांनी थेट आमदार रोहित पवार यांना आव्हान दिले आहे.

मोहित कंबोज यांनी बारामती ॲग्रोबाबत लवकरच माहिती जाहीर करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यांनी ट्विट केले आहे, त्यात म्हटलं आहे की, बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीची केस स्टडी मी करत आहे. त्या केस स्टडी संदर्भातील संपूर्ण माहिती मी लवकरच बाहेर घेऊन जाणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.

तसेच म्हणाले, मी वैयक्तिकरित्या या कंपनीच्या उपलब्धींचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. यामागील यशोगाथा समजून घेण्यास तरुणांना मदत करणारा संक्षिप्त अभ्यास लवकरच शेअर करणार आहे, असे मोहित कंबोज यांनी ट्विट केले आहे.

आधी सिंचन घोटाळा तर आता रोहित पवार यांच्या ॲग्री आणि सहकारी कारखान्यांबाबतचा अभ्यास सुरू केल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. कंबोज राष्ट्रवादी नेते रोहित पवार यांच्याबाबत आता कोणती नवीन माहिती समोर आणणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दरम्यान, मोहित कंबोज यांच्या ट्विटला फारसे महत्व देण्याचं काम नाही, मोहित कंबोज यांनी स्वतः ओव्हरसिज बॅंकेतील ५२कोटी बुडवून जनतेला चुना लावला होता, आता त्यांना राष्ट्रवादीच्या नेत्याबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तसेच रोहित पवार म्हणाले, सोलापुरातील राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे, पण, जे लोक एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातमध्ये सुरुवातीपासून होते, त्यांना काहीही मिळालं नाही, तर उशिरा गेलेल्यांना मंत्रिपद मिळालं. शिंदे यांनी जास्त भरती केल्यामुळे लोक गुदमरत आहेत.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now