Share

आता इरफान पठानने केला अमित मिश्रावर पलटवार, म्हणाला, मी प्रत्येक नागरिकाला त्याचे पालन करण्याचे..

भारतीय संघाचे दोन क्रिकेटपटू इरफान पठाण(Irfan Pathan) आणि अमित मिश्रा यांच्यातील वाद कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. शुक्रवारी सकाळी इरफान पठाणने भारत देशाबाबत एक ट्विट केले. इरफानचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले. यानंतर लेगस्पिनर अमित मिश्राने इरफान पठाणचे नाव न घेता ट्विटला उत्तर दिले. आता माजी अष्टपैलू इरफानकडून उत्तर आले आहे.(now-irfan-pathan-retaliated-against-amit-mishra-saying-i-urge-every)

इरफानने ट्विटरवर एका पोस्टमध्ये लिहिले, ‘माझा देश, माझा सुंदर देश, पृथ्वीवरील महान देश बनण्याची क्षमता ठेवतो, पण…’ अमित मिश्रा(Amit Mishra) यांनी काही तासांनंतर ट्विट केले. ज्यामध्ये त्याने ही ओळ पूर्ण केली. त्यांनी लिहिले, ‘माझा देश, माझा सुंदर देश, पृथ्वीवरील महान देश बनण्याची क्षमता ठेवतो. तरीही काही लोकांना याची जाणीव व्हावी कि, आपली राज्यघटना ही पालन केला जाणारा पहिला ग्रंथ आहे.

या दोन ट्विटनंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत होत्या. आता पठाण यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचा फोटो शेअर केला आहे. यासोबत त्यांनी लिहिले की, ‘नेहमी त्याचे पालन केले आणि मी आपल्या सुंदर देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचे पालन करण्याचे आवाहन करतो. कृपया वाचा आणि पुन्हा पुन्हा वाचा.’ मात्र, या पोस्टमध्येही इरफान पठाणने अमित मिश्राचे नाव घेतलेले नाही.

37 वर्षीय इरफान पठाणने भारताकडून 29 कसोटी, 120 एकदिवसीय आणि 24 टी-20 सामने खेळले आहेत. तो शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2012 मध्ये खेळला होता. तो आयपीएलमध्ये कॉमेंट्री करत आहे. अमित मिश्राने 22 कसोटी, 36 एकदिवसीय आणि 10 टी-20 सामने खेळला आहे.

2017 मध्ये त्याला अखेरची भारताकडून खेळण्याची संधी मिळाली. आयपीएलमध्ये गेल्या सीजनपर्यंत तो दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता, पण यंदाच्या लिलावात त्याला कोणीही विकत घेतले नाही.

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now