खून केल्याच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात असणारा पुणे येथील कुख्यात गुंड गजा मारणे याची सात वर्षांनंतर सुटका झाली होती. मात्र यानंतर त्याच्या समर्थकांनी मारणे याची मोठी रॅली काढली होती. मात्र या रॅलीबाबत प्रश्न निर्माण झाल्यानंतर पुणे पोलिसांनी मारणे विरोधात गुन्हा नोंद केला होता.
तसेच पुणे ग्रामीण पोलिसांनीअटक करुन गुंड गजानन मारणे याच्यावर एम पी डी ए कायद्यान्वये १ वर्ष स्थानबद्ध केले होते. अखेर तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर रॅली काढल्याप्रकरणी नागपूर कारागृहात स्थानबद्ध असलेल्या पुण्यातील गुंड गजा मारणे याची रविवारी दुपारी 2 वाजता सुटका झाली आहे.
तर दुसरीकडे आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरच गजा मारणेची सुटका झाल्याने याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटणारं असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच मनसेला जबर धक्का बसला आहे.
माजी नगरसेविका व गुंड गजा मारणे याच्या पत्नी जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. महापालिका निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहीले असताना जयश्री मारणे यांनी केलेला पक्षप्रवेश आणि गुंड गजा मारणे याची तुरुंगातून झालेली सुटका, सध्या राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे.
त्यामुळे आता आगामी काळात राजकीय समीकरणे नक्की कशी बदलणार याचे चित्र अद्याप अस्पष्ट असले, तरी देखील लवकरच या गोष्टी समोर येणार आहेत. गुंड गजा मारणे याची तुरुंगातून झालेली सुटका आणि पत्नीचा राष्ट्रवादीत प्रवेश याचा आगामी महानगर पालिकेत काय फायदा होणार, हे लवकरच स्पष्ट होईल.
तर जाणून घ्या गुंड गजा मारणे याला का झाली होती अटक.. गजा मारणे 2014 मधील दोन हत्या प्रकरणात सात वर्ष तळोजा कारागृहात शिक्षा भोगत होता. गेल्या वर्षी या हत्येच्या गुन्ह्यातून त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. यानंतर त्याच्या साथीदारांनी तळोजा जेल ते पुणे अशी 300 गाड्यांसह मिरवणूक काढली होती. तसेच उर्से टोल नाक्यावर फटाके फोडत आरडाओरडा करत या सर्वाचे ड्रोन शूटही केले होते.
याच मिरवणुकीमुळे गजा मारणेला पुन्हा तुरुंगवारी करावी लागली. हा प्रकार मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाका येथे घडला. याप्रकरणी मारणेसह त्याच्या साथीदारांवर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसांत वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, त्यानंतर गजा मारणे फरार झाला होता. पोलिसांना गुंगारा देऊन मारणे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात लपून बसला होता. अखेर 6 मार्च 2021 रोजी साताऱ्यातील जावळी तालुक्यातून गजाला अटक करण्यात आली. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याने प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्याला एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले होते.
अखेर तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर रॅली काढल्याप्रकरणी नागपूर कारागृहात स्थानबद्ध असलेल्या पुण्यातील गुंड गजा मारणे याची सुटका झाली आहे. याबाबत मारणे याचे वकील अॅड विजयसिंह ठोंबरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
जडेजाचे द्विशतक पूर्ण न होण्यास नक्की कोण जबाबदार? रोहित शर्माने केला मोठा खुलासा
‘आश्रम’मधील बबिताचा हॉट अवतार पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम, ह्रदयावर ताबा ठेवणे झाले अवघड
मोलकरणीने हार्पिक आणि झंडू बामपासून बनवला आय ड्रॉप, ७३ वर्षीय महिलेला केले आंधळे; कारण वाचून हादराल
पती रूममध्ये आला आणि.., लग्नाच्या पहिल्याच रात्री प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडला भन्नाट किस्सा