Share

नवनीत राणांची जीभ घसरली! ‘मला विचारुन लफडे केले का तुम्ही?’, ऑडिओ क्लीप व्हायरल

navanit rana

अमरावती मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) या पुन्हा एकदा चांगल्याच चर्चेत आल्या आहे. अमरावती जिल्ह्यातील खासदार नवनीत राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने पत्नी आणी १८ महिन्यांच्या मुलीला वाऱ्यावर सोडून दुसऱ्या स्त्रीसोबत घरठाव केला. महिलेने तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता खासदार नवनीत राणा यांनी तिच्यासोबत आक्षेपार्ह भाषेत संभाषण केले. (notice issued by the womens commission ba conversatio navneet rana)

त्याच झालं असं तक्रारदार महिलेने खासदार राणा यांना कॉल करून आपली परिस्थिती सांगितली व पार्टीच्या कार्यकर्त्यांना समज देण्याची विनंती केली. मात्र, यावर चिडत खासदार नवनीत राणा यांनी पीडितेची उलट तपासणी सुरू करत तुम्ही मला विचारुन लफडा केला का? असा उलट प्रश्न त्या महिलेला विचारला.

दरम्यान, नवणीत राणा यांची ही मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. खासदार या नात्यानं त्यांच्या भागातील कुणी पीडितांनी… किंवा महिलांनी त्यांच्याकडून अपेक्षा करू नये, मग कुणाकडे करावी? असा सवाल आता उपस्थित होतं आहे.

यासंदर्भात महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. अमरावती जिल्ह्यातील महिलेची तक्रार राज्य महिला आयोगाला १७ जानेवारी रोजी प्राप्त झाली होती. यानंतर नवनीत राणा यांना नोटीस बजावून खुलासा मागितल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी सांगितले.

तक्रारीची दखल घेत राज्य महिला आयोगाने संबंधित पोलिस ठाण्याला कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. पतीने आपल्याला अंधारात ठेवून दुसरा विवाह केला आणि १८ महिन्यांच्या मुलीला वाऱ्यावर सोडले, असा आरोप महिलेने केला होता. तसेच हा पदाधिकारी नवनीत राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीचा प्रदेशाध्यक्ष आहे. राणा यांनी महिलेची तक्रार ऐकून न घेता आरोपीला पाठीशी घालण्याचे काम केल्याचे महिलेचे म्हणणे आहे.

दरम्यान, महिलेने नवनीत राणा यांना फोन केला असता नंबर ब्लॉक करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या नंबरवरून खासदार राणा यांना फोन केला असता, त्यांनी आक्षेपार्ह भाषेत महिलेशी संवाद साधला. खासदार राणा यांनी जे संभाषण केले, ते अतिशय अश्लील होते आणि ते मानहानी करणारे होते अशी तक्रार महिलेने राज्य महिला आयोगाकडे केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
“नागपूरात महिलांचा नग्न डान्स, ठाकरे सरकारने सर्व लाजशरम वेशीवर टांगलीय का?”
आता माणसाच्या मेंदूत बसवणार चिप; जुन्या आठवणी नवीन शरीरात करणार ट्रांसफर
राजनाथ सिंहांच्या मुलाला तिकीट पण मनोहर पर्रीकरांच्या मुलाला का नाही? काय आहे भाजपचा गेमप्लॅन?
राजनाथ सिंहांच्या मुलाला तिकीट पण मनोहर पर्रीकरांच्या मुलाला का नाही? काय आहे भाजपचा गेमप्लॅन?

इतर क्राईम ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now