Share

सदावर्तेंच्या घरात आढळली भलतीच गोष्ट; बस डेपोतून पैसे गोळा करण्याचा ‘मास्टरप्लॅन’ आला समोर, अडचणी वाढणार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते हे चांगलेच चर्चेत आले आहेत. दिवसेंदिवस त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आता अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या घरात आढळलेल्या वस्तूंमुळे यांच्या अडचणींमद्धे आणखी वाढ होणार असल्याचं दिसतं आहे.

अॅड सदावर्ते यांच्या घरातून ताब्यात घेतलेल्या हिरव्या रंगाच्या रजिस्टरमध्ये 250 डेपोतून पैसे कसे गोळा करायचे याचा उल्लेख असल्याचा दावा सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी केला आहे. यामुळे आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागणार का? हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे.

जाणून नेमकं अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या घरात काय सापडले? सदावर्तेंच्या घरात काही संशयास्पद कागदपत्रं सापडली आहेत. एका रजिस्टरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा केल्याचा उल्लेख आहे. दरम्यान, घरत यांनी न्यायालयात दिलेल्या नव्या माहितीमुळे सदावर्तेंच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे याचा तपास होण्याची गरज असल्याच घरत यांनी स्पष्टच बोलून दाखवल आहे. त्यासाठी सदावर्तेंची चौकशी व्हायला हवी. त्यामुळेयचबरोबर त्यांची कोठडी वाढवून देण्याची विनंती घरत यांनी न्यायालयाकडे केली असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे, सदावर्तेंच्या घरात पोलिसांना नोटा मोजण्याची मशीन आढळून आल्याची माहिती घरत यांनी न्यायमूर्तींना दिली. पैसे मोजण्याच्या मशीनमधून 85 लाख रुपये मोजले आहेत. तसेच यावर घरात म्हणाले, आरोपीचं म्हणणं आहे मी वकील आहे.

मात्र ते 20 वर्षांपासून ते वकीली करतायत. या काळात त्यांनी प्रॉपर्टी घेतल्या. त्यामुळे हे संशयास्पद आहे. याचा अधिक तपास करायचा आहे. काही 35 पेपर त्यांच्या घरातून जप्त केले आहेत. त्यामुळे आम्हाला पोलिस कोठडी हवी आहे, असे घरात यावेळी बोलताना म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
आवाराच्या बाहेर लाऊडस्पिकरचा आवाज नाही आला पाहीजे, नाहीतर…; मुख्यमंत्री योगींचे थेट आदेश
लोकांना झटपट श्रीमंतीचं स्वप्न दाखवणाऱ्या Amway कंपनीला ईडीचा दणका; कोट्यवधींची संपत्ती जप्त
‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजलने दिला मुलाला जन्म; सोशल मीडियावर होतोय शुभेच्छांचा वर्षाव
‘ब्राह्मणांनी समर्थ रामदास व दादोजी कोंडदेवांना शिवाजी महाराजांच्या गुरूपदी लादले’

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now