Share

ताजमहाल नाही तर श्रीरामाने बांधलेला सेतू प्रेमाचे प्रतीक आहे; त्याचा अभिमान बाळगा- बड्या गायकाने मांडलं मत

उज्जैन। आपण आपल्या पूर्वजांकडून किंवा ग्रंथातून, अनेक पुस्तकातून खऱ्या प्रेमाचा अर्थ जाणून घेतला. शंकर-पार्वती, राधा-कृष्ण, राम- सीता यांनी आपल्याला खऱ्या प्रेमाचा अर्थ शिकवला. तसेच शहाजहानने बांधलेला ताजमहाल देखील आपल्याला खऱ्या प्रेमाचे प्रतीक वाटते मात्र खरंच ताजमहाल खऱ्या प्रेमाचे प्रतीक आहे का? याच प्रश्नावर बोलतांना गीतकार मनोज मुंतशीर  यांनी अनेक खुलासे केले.

उज्जैनमध्ये शनिवारी म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शहरात गौरव दिन साजरा करण्यात आला होता. हा कार्यक्रम संध्याकाळी पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील हजेरी लावली. तसेच प्रसिद्ध गीतकार मनोज मुंतशीर यांनी या कार्यक्रमाला जणू चार चाँद लावले. या कार्यक्रमात बोलतांना मनोज मुंतशीर यांनी सर्वांना खऱ्या प्रेमाचे प्रतीक समजावून सांगितले.

मनोज मुंतशीर बोलतांना म्हणाले, मुघलांनी आपल्या देशाला लुटले आणि प्रेमाच्या नावाखाली ताजमहाल बांधला. देशात उपासमारीमुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि त्याच वेळी शहाजहान कोटी रुपये ताजमहालच्या बांधकामावर खर्च करत होता.

जेव्हा देशातील ३५ लाख लोक उपासमारीने मेले तेव्हा शहाजहान तब्बल ९ कोटी रुपये ताजमहालच्या बांधकामावर खर्च करत होता. दरम्यान या पैशातून देशाची गरिबी नष्ट झाली असती, लाखो लोकांचे प्राण वाचले असते. मात्र मुघलांनी ते केले नाही त्यामुळे गीतकार मनोज मुंतशीर यांनी मुघलांना दरोडेखोर म्हणून संबोधले आहे.

एवढेच नाही तर पुढे मनोज मुंतशीर असेही म्हणाले की, आपल्याला संपूर्ण इतिहास चुकीचा शिकवला गेला आहे. काही इतिहासकारकांनी उजव्या बाजूने इतिहास लिहिला आणि ताजमहाल हे प्रेमाचे प्रतीक असल्याचे सांगितले, मात्र ताजमहाल खऱ्या प्रेमाची निशाणी नसून त्यांनी आपल्या गरीब जनतेच्या प्रेमाची चेष्टा केल्याचे मुंतशीर यांनी सांगितले. तसेच मुंतशीर यांनी खऱ्या प्रेमाची निशाणी लोकांसमोर मांडली.

खऱ्या प्रेमाची निशाणी जाणून घ्यायची असेल, तर चित्तोड किल्ल्याचा पूर्ण इतिहास जाणून घ्या. त्यावेळी माता पद्मिनी राजा रतन सिंह यांच्यापासून दुरावल्यामुळे माता पद्मिनी यांनी स्वतःला आगीत झोखून दिले. एवढेच नाही तर माता सीतेसाठी राजा रामाने समुद्र फाडून त्यामधून सेतू बांधला हे खऱ्या प्रेमाचे प्रतीक आहे याचा आपण सर्वांनी अभिमान बाळगला पाहिजे, असेही मुंतशीर म्हणाले.

गीतकार मनोज मुंतशीर यांनी या कार्यक्रमाच्यावेळी बोलतांना आपले मनोगत व्यक्त केले. म्हणाले की, या कार्यक्रमासाठी मी उज्जैनमध्ये उभा आहे या गोष्टीचा मला अभिमान आहे. कारण महान कवी कालिदास यांच्या कर्मभूमीवर मी उभा आहे. एवढेच नाही तर जिथे समुद्रमंथनातून बाहेर आलेले अमृत सांडले होते, त्या अवंतिका नगरीत मी उभा आहे याचा मला अभिमान आहे. पुढे त्यांनी उच्च शिक्षणमंत्री डॉ.मोहन यादव यांचे देखील आभार मानले.

महत्वाच्या बातम्या: 

दोन रुपयांच्या ‘या’ शेअरनं दिला जबरदस्त परतावा; 1 लाखाचे केले तब्बल 13 कोटी रुपये…

IPL चा सामना सुरू असताना त्या कपलला रहावले नाही; स्टेडियममध्येच चालू केला किसिंग सीन, VIDEO झाला व्हायरल

यशपासून संजय दत्तपर्यंत, KGF 2 साठी कलाकारांनी घेतले तब्बल ‘एवढे’ कोटी, वाचून डोळे फिरतील

लक्षात ठेवा..! ‘…असल्या थेरांना घाबरणारी चित्रा वाघ नाही,’ चित्रा वाघ यांच्या कोल्हापुरातील सभेवर दगडफेक

 

 

 

इतर ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now