Share

महाराष्ट्राचा जावई असलेल्या या सुपरस्टारसोबत चित्रपट बनवणार राजामौली, बॉक्स ऑफिस पुन्हा हादरवणार

साऊथच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे धुमाकूळ घातला आहे. अलीकडे, एसएस राजामौली यांच्या RRR या चित्रपटाची मोठ्या पडद्यावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. हा चित्रपट हिट झाल्यानंतर राजामौली खूप आनंदी दिसत आहेत. यासंदर्भात त्यांनी पार्टीही आयोजित केली होती.

आता दरम्यान RRR च्या दुसऱ्या भागाबद्दल खूप बातम्या येत आहेत. या सर्व अफवांच्या दरम्यान, राजामौली(Rajamouli) यांनी त्यांच्या पुढील चित्रपटाबद्दल आणि त्यांच्या सुपरस्टारबद्दल खुलासा केला आहे. चला तर मग जाणून घेऊया राजामौली यांच्या पुढच्या चित्रपटात कोणता सुपरस्टार दिसणार आहे.

दक्षिणेतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, त्यांनी हातात घेतलेला चित्रपट हिट होतो. दरम्यान, त्यांनी आपल्या आगामी चित्रपटांबद्दल एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, ‘आम्ही काही कल्पनांवर विचारमंथन सुरू केले, माझ्याकडे महेश बाबू(Mahesh Babu)साठी एकूण 2 पिच आहेत. हे दोन्ही अतिशय रोमांचक आणि लार्ज स्केल चित्रपट आहेत.’

साऊथचा सुपरस्टार अभिनेता महेश बाबूने अनेक अॅक्शन चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो एक प्रसिद्ध अॅक्शन हिरो आहे. एसएस राजामौली यांच्या दृष्टिकोनातून ते पुन्हा मेगा बजेट चित्रपट बनवणार असल्याचे दिसते. राजामौली यांनी यापूर्वी बाहुबली आणि बाहुबली 2 सारखे बिग बजेट चित्रपट केले आहेत.

राम चरण(Ram Charan) आणि ज्युनियर एनटीआर(Junior NTR) यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट आरआरआर सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली आहेत. त्यांचा आरआरआर हा चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींचा टप्पा पार करणार आहे आणि असे सांगितले जात आहे की राजामौली आता RRR चा भाग 2 देखील आणणार आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटते, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now