Share

मी नाही, तर ‘हे’ आहे युझवेंंद्र चहलचे पहिले प्रेम; स्वत: धनश्री वर्मानेच केला मोठा खुलासा

टीम इंडियात ‘कुलच्या’ म्हणून टोपण नावाने ओळखला जाणारा लेगस्पिनर युझवेंद्र चहल खट्याळ, मस्तीखोर स्वभावाचा आहे. त्याच्या या स्वभावाशी सर्व परिचित आहेत. चहल सतत इंस्टाग्रामवर मजेशीर रिल शेअर करून सर्व लोकांचे मनोरंजन करत असतो. त्याचा ‘चहल टीव्ही’ असा मजेशीर ड्रामा टीममध्ये फार फेमस आहे. अशा गमतीजमती करायला कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या दोघांची जोडी असते त्यामुळे त्यांना ‘कुलच्या’ म्हटले जाते. (Not me, but ‘this’ is Yuzvendra Chahal’s first love..)

चहलने आयपीएल २०२२ मध्ये राजस्थान संघाकडून खेळताना उत्तम कामगिरी केली आहे. त्याने १७ सामन्यात २७ विकेट घेतल्या आहेत.सर्वाधिक विकेट्स घेऊन तो पर्पल कॅपचा मानकरी ठरला. त्यासाठी त्याला १० लाख रक्कम बक्षीस देण्यात आली. त्याने या सिझनमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध विकेट्सची एकमेव हॅट्ट्रिक केली होती.

युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा २०२२च्या संपूर्ण आयपीएल सिझनमध्ये राजस्थान संघाला चेअर करताना दिसली. युझवेंद्र चहलचा उत्साह वाढवण्यासाठी तिने सर्व सामान्यांना हजेरी लावली होती. धनश्री वर्माला जेव्हा तिच्या पतीच्या सुंदर हस्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, तो त्याच्या पहिल्या प्रेमाच्या (क्रिकेट)आसपास असतो. तो तणाव दूर करण्यासाठी मैदानावर कायम हसत असतो. राजस्थान संघाकडून आयोजित एका पॉडकास्टवर बोलताना तिने ही गोष्ट सांगितली.

पुढे बोलताना धनश्री म्हणाली, ‘खरं सांगायचं तर युजी खूप रसिक आहे आणि त्याला क्रिकेट आवडतं. त्याचे पहिले प्रेम क्रिकेट आहे, त्याच्या नेहमी हसमुख राहण्याचे आणि सुंदर हसण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याच्या सहकाऱ्यांचे आजूबाजूचे वातावरण. ज्यात तुम्हाला समतोल राखण्याची गरज असते. वातावरण नक्कीच खूप मैत्रीपूर्ण आहे, परंतु ते तणावपूर्ण देखील असते.

‘जेव्हा लोकं आयपीएल, कसोटी किंवा एकदिवसीय सारखा कोणताही खेळ पाहण्यासाठी येतात तेव्हा ते तणावग्रस्त असतात कारण ते एखाद्या संघाला समर्थन देत असतात. तुमची टीम चांगली कामगिरी करत असल्याचे तुम्हाला नक्कीच पहायचे असते. त्यामुळे तणावाचं वातावरण असतं, असं धनश्री म्हणाली.

युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा ही युट्यूबर आहे. तिचे फॉलोअर्स पण खूप आहेत. धनश्री उत्तम डान्सर असून तिचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. धनश्री वर्मा आणि युझवेंद्र चहल यांचे डिसेंबर २०२० मध्ये लग्न झाले होते. युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे ‘मेड फॉर इच अदर’ असे कपल आहे.

महत्वाच्या बातम्या –
पंकजा मुंडेंना मिळणार विधान परीषदेची आमदारकी; पुन्हा होणार राज्याच्या राजकारणात सक्रीय
….अन् मराठीतून बोलायचं म्हणून घाबरली काजोल, थेट मंचावर आईला मारली मिठी; वाचा नेमकं काय घडलं
मुसेवालाची हत्या करणारे शुटर पुण्यातले सराईत गुन्हेगार, एकाने १६ व्या वर्षीच केलाय सरपंचाचा हाफमर्डर

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now