शिवसेनेने संभाजी छत्रपतींना शिवसेनेत प्रवेश करण्याची ऑफर दिली. शिवसेनेत या आणि राज्यसभेवर निवडून जा असे शिवसेनेचे मत आहे. मात्र संभाजी छत्रपतींना हे मान्य नाही. त्यामुळे आता जर शिवसेनेची ऑफर संभाजी छत्रपतींनी स्वीकारली नाही तर त्याचा अधिक तोटा हा शिवसेनेलाच होईल असे बोलले जात आहे.
संभाजीराजे अपक्ष लढण्यावरच ठाम आहेत. शिवसेनेने संभाजी राजेंना ऑफर दिली की, जर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवबंधन बांधले तर राज्यसभेवर निवडून जा. अशी ऑफर शिवसेनेने दिली आहे. तर तुम्ही अपक्ष निवडणूक लढवली तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ असे भाजपने म्हटलं आहे.
भाजपने असे म्हणण्याचे कारण नक्कीच भाजपकडे संभाजीराजेंना निवडून आणण्याऐवढी मतं नाहीत. शिवसेनेकडे मते आहेत, मात्र शिवसेनेने त्यांच्यापुढे ठेवलेली अट त्यांना मान्य नाही. त्यामुळे संभाजीराजे हे अपक्ष लढण्यावरच ठाम आहेत. मात्र, अशी स्थिती झाली तर याचा सर्वाधिक तोटा शिवसेनेला होईल असे बोलले जात आहे.
संभाजीराजे अपक्ष लढून पराभूत झाले तर त्याचं शिवसेनेलाच नुकसान होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण महाराष्ट्रातील मराठा वर्ग संभाजी राजेंच्या पाठीशी मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे हा मराठा वर्ग निवडणुकीत शिवसेनेकडे पाठ फिरवू शकतो, असे बोलले जात आहे.
मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी जी आंदोलने केली, उपोषण केले त्यावरून त्यांना मानणारा मराठा वर्ग राज्यभर मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. अशावेळी शिवसेनेने त्यांना उमेदवारी नाकारल्यास त्याचं नुकसान शिवसेनेला होऊ शकतं. पुढे शिवसेनेलाच विधानसभेच्या निवडणुकीत मराठा समाजाच्या रोषाची किंमत चुकवावी लागू शकते.
संभाजीराजेंना विरोध करणं हे शिवसेनेला परवडणार नाही असे बोलले जात आहे. राजकीय वर्तुळात अशी चर्चा तर होतच आहे, मात्र शिवसेना आमदार देखील आता अशा पद्धतीचे वक्तव्य करू लागले आहेत. त्यामुळे आता पुढे शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यात नेमका कोणता निर्णय होईल पाहावं लागेल.