Share

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या पत्रामुळे नाही, तर ‘या’ 5 कारणांमुळे भाजपने निवडणुकीतून घेतला काढता पाय

Raj Thackeray Devendra Fadanvis

Raj Thackeray : अखेरच्या क्षणी भारतीय जनता पक्षाच्या मुरजी पटेल यांनी अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांना याबाबत पक्षश्रेष्टीकडून तसा आदेश आला होता. भाजपने आपला उमेदवार मागे घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यात यावी अशी मागणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देवेंद्र फडवणीस यांना पत्राद्वारे केली होती.

अशाच प्रकारची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा केली होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षावर आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्यासाठी दबाव वाढत होता. याचं दबावापोटी भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला की त्याला आणखी कोणती कारण होती. याचा आढावा आपण या लेखात घेऊ.

भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरजी पटेल हे गुजराती आहेत. हा मुद्दाही या निवडणुकीत गाजला असता. अंधेरी पूर्व मतदारसंघात 1 लाखापेक्षा जास्त मराठी मतदार आहेत. स्वाभाविक पणे त्यांनी या निवडणुकीत ऋतुजा लटकेंना आपला पाटिंबा दिला असता. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला पराभव स्विकारावा लागला असता.

दुसरे मोठे कारण आहे ते म्हणजे ऋतुजा लटके यांच्याकडे असलेली सहानभूतीची लाट. अनेक सर्वेक्षणात ऋतुजा लटके यांना मतदारांनी आपला पाटिंबा दिला होता. त्यामुळेही भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवाराला मागे खेचण्यातच राजकीय फायदा मानला.

ठाकरे गटाकडून मुरजी पटेल यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप लावण्यात आले होते. त्यांनी बिल्डरसोबत हातमिळवणी करत कोठ्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. SRA योजनेतील लोकांना आणखीही घर मिळालेले नाहीये. या प्रकरणात मुरजी पटेल यांनी बिल्डरची बाजू घेतली होती. त्याचा ही फटका त्यांना या निवडणुकीत बसला असता.

मुरजी पटेल यांचे नाव आशिष शेलार यांनी पुढे केले होते. त्यांचे नाव जाहीर करतांना त्यांनी पक्षाच्या संसदीय समितीचा सल्ला पण घेतला नव्हता. त्यामुळे मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यावरून आशिष शेलार पक्षातच एकटे पडले होते. हे ही एक कारण आहे.

पोटनिवडणुकीत अर्ज मागे घेण्याचे सर्वात मोठे कारण आहे, मुंबई आणि राज्यातील इतर महानगरपालिकेच्या निवडणुका. ठाकरे गटाचा जर या पोटनिवडणुकीत विजय झाला असता तर हे भाजपाला महानगरपालिका निवडणुकांमध्ये नुकसानदायक ठरले असते. त्यामुळेच भाजपने भविष्याचा विचार करता एक पाऊल मागे टाकले आहे.

महत्वाच्या बातम्या
Shakti Kapoor : अभिनेत्रीचे शक्ती कपूरवर गंभीर आरोप, म्हणाली, बोल्ड सीन करताना तो एवढा उत्तेजीत झालता कि….
rupali thombare : नाशिक पेठमध्ये विजय मिळवल्यानंतर रुपाली ठोंबरेंच्या झिरवळांना खास शुभेच्छा, म्हणाल्या, झाडी, डोंगर, हाटील…
Suryakumar yadav : ‘तो जगातील नंबर १ फलंदाज’, ऑस्ट्रेलियन खेळाडूने ‘या’ भारतीय फलंदाजाचे केले तोंडभरून कौतुक   

 

राज्य ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now