Share

आलिया-दीपिका नाही तर ‘ही’ अभिनेत्री आहे रणबीर कपूरची फेव्हरेट, म्हणाला, तिच्यासोबत रोमान्स…

रणबीर कपूर(Ranbir Kapoor) सध्या बॉलीवूडमधील सर्वात आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे. आजकाल अभिनेता त्याच्या आगामी ‘शमशेरा’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ या दोन चित्रपटांमुळे सतत चर्चेत असतो.

तब्बल 4 वर्षांनंतर रणबीर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. तो सध्या त्याच्या ‘शमशेरा'(Shamshera) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडत नाहीये. अलीकडेच एका मुलाखतीत रणबीरचे अनेक जुने फोटो दाखवण्यात आले. या सेगमेंटदरम्यान त्याचा ऐश्वर्यासोबतचा एक यंग फोटोही होता. फोटो पाहून रणबीर कपूरने आपली प्रतिक्रिया दिली.

हा फोटो पाहून रणबीर कपूर म्हणाला, “या फोटोचा कोणाला हेवा वाटणार नाही?” तो पुढे म्हणाला की तो ‘आ अब लौट चले’ या चित्रपटात त्याच्या वडिलांना असिस्ट करत होता. हा फोटो न्यूयॉर्कमध्ये घेण्यात आला आहे.

अभिनेत्याने खुलासा केला की तो ऐश्वर्यापेक्षा(Aishwarya) लहान असूनही ते मित्र होते आणि ते चित्रपटांबद्दल बोलत असत. रणबीरने सांगितले की, तो शूटिंग करत असताना ‘हम दिल दे चुके सनम’मधील त्याच्या व्यक्तिरेखेबद्दलही बोलला होता.

शूट पूर्ण केल्यानंतर ऐशने रणबीरची भेट घेतली आणि एकत्र जेवण केले. रणबीर कपूरने स्वतःला भाग्यवान मानले की त्याला ऐश्वर्या राय बच्चन(Aishwarya Rai Bachchan) सारखी मैत्रीण मिळाली आणि तिच्यासोबत चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

तो हसला आणि म्हणाला, ‘ऐश्वर्या रायसोबत पडद्यावर रोमान्स करण्याची संधी फार लोकांना मिळत नाही.’ रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन करण जोहरच्या ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटात एकत्र दिसले होते.

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now