राजकारण तापलेले असतानाच काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राजे ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना अयोध्या दौऱ्याबद्दल घोषणा केली. राज ठाकरे अयोध्या दौऱ्याची घोषणा करताच राजकारण तापण्यास सुरुवात झाली. त्यानंतर चर्चेत आले उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार बृजभूषण सिंह.
‘राज साहेब अयोध्या दौऱ्यावर येण्याआधी हात जोडून माफी मागण्याची मागणी केली. तसेच माफी न मागितल्यास उत्तर प्रदेशात घुसून देणार नाही, अशी धमकी भाजप खा. बृजभूषण सिंह यांनी दिली होती. त्यानंतर देखील अनेक आरोप – प्रत्यारोप झालेले पाहायला मिळाले.
मात्र अशातच राज ठाकरेंनी एक ट्विट केलं आणि मनसैनिकांच्या आनंदावर विरजण पडले. राज यांनी दौरा स्थगित केला. राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं होतं की, ‘तूर्तास अयोध्या दौरा स्थगित, महाराष्ट्र सैनिकांनो या.. यावर सविस्तर बोलू,’ असं ट्विट राज ठाकरेंनी केलं होतं.
अजूनही या प्रकरणाचे पडसाद उमटत आहेत. बृजभूषण सिंह यांच्याविरोधात मुंबईत उत्तर भारतीय संघटनेने आंदोलन केले आहे. ‘गेली १४ वर्ष कुठे झोपले होते?,’ असा संतप्त सवाल त्यांनी आंदोलनावेळी उपस्थित केला आहे. यामुळे आता पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.
याबाबत बोलताना गोविंद पांडे म्हणाले की, ‘ज्यादिवशी राज ठाकरे अयोध्येत जातील तेव्हा आम्ही त्यांचे अयोध्येत स्वागत करू, असे ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, ‘ज्यादिवशी बृजभूषण सिंह मुंबईत येतील तेव्हा सर्वात आधी चपलांचा हार आम्ही घालू असा इशारा पांडे यांनी दिला आहे.
दरम्यान, ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांचा हात बृजभूषण सिंह यांच्या डोक्यावर आहे. शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचे संबंध आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना अडवण्यासाठी बृजभूषण सिंह यांचा ट्रॅप शरद पवारांनीच आखला होता असा खळबळजनक आरोप गोविंद पांडे याणी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
नवाब मलिक मुसलमान आहेत म्हणून…; शरद पवार आणि मोदींच्या ‘त्या’ भेटीवरून ओवेसी भडकले
लघवी आणि सांडपाण्यापासून बनवलेल्या ‘या’ बीअरला जगभरातून आहे प्रचंड मागणी; फायदे ऐकून बसेल धक्का
२६ दिवस जेलमध्ये राहणाऱ्या आर्यनला ड्रग्ज प्रकरणातून मिळाली क्लीन चिट; आता नुकसान भरपाई सुद्धा मिळणार
मोदी करणार ‘गुजरात टायटन्स’ ला सपोर्ट? फायनलपूर्वी गुजरातमध्ये दाखल झाल्याने चर्चेला उधाण