छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र त्यांचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न अनेक लेखक, इतिहासकार करत असतात. त्यांनी केलेल्या लिखाणातून सामान्य लोकांना इतिहास समजतो. परंतु याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठे विधान केले आहे. (“Nobody did as much injustice to Shiv Raya as Purandare)
शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल ते म्हणाले की, बाबासाहेब पुरंदरेंची भाषणं, त्यांचं लिखाण माझ्या मते छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांच्या इतका अन्याय कोणी केला नसेल, असे मोठे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.
डॉ.श्रीमंत कोकाटे यांच्या ‘शिवचरित्र आणि विचारप्रवाह’ या ग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रकाशन सोहळ्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे. या कार्यक्रमाला छत्रपती शाहू महाराज आणि बी जी कोळसे पाटील उपस्थित होते.
यावेळी “बाबासाहेब पुरंदरेंची भाषणं, त्यांचं लिखाण माझ्या मते छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांच्या इतका अन्याय कोणी केला नसेल,” असे परखड विधान पवारांनी केले. ते पुढे म्हणाले की, ‘बाबासाहेब पुरंदरेंनी जे काही लिखाण केलं. जी काही मांडणी केली. ती मांडणी ज्या व्यक्तीला सत्यावर विश्वास आहे, असा कोणताही घटक त्याला मान्य करणार नाही.’
‘अनेक गोष्टी आहेत ज्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. त्या गोष्टी सत्य जरी असल्या तरी न पटण्यासारख्या आहेत. परंतु माझ्या मते श्रीमंत कोकाटे यांनी हे काम चांगल्या प्रकारे केलं आहे. गोष्टींचे वास्तव चित्र त्यांनी दर्शवले आहे,’ असे पवार म्हणाले.
‘शिवछत्रपतींचा उल्लेख करताना काही लोकांनी त्यांना धर्मांध रंगवण्याचा, संकुचित चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु श्रीमंत कोकाटे यांनी सत्य मांडले आहे. असे काम कॉम्रेड पानसरे यांनी देखील केले आहे,’ असंही शरद पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
चंद्रकांत पाटलांच्या ‘या ‘वादग्रस्त भाषणाचा व्हिडीओ डिलीट करण्याचे आदेश थेट केंद्रातून; काय म्हणाले होते नेमकं? वाचा
रणवीरसिंगच्या न्युड फोटोनंतर बडा राजकीय नेता संतापला; उपस्थीत केला ‘हा’ सवाल
गृहमंत्री पद दिले तर मनसे शिंदे सरकारमध्ये सहभागी होईल; अमित ठाकरेंची घोषणा