Share

शेअर नाही हे तर राॅकेट! कॉम्प्रेसर बनवणाऱ्या ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना दिला ४००% परतावा

गुंतवणूकदारांसाठी जबरदस्त रिटर्न देणाऱ्या एका कंपनीबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. या कंपनीच्या शेअरने गेल्या दोन वर्षांत गुंतवणूकदारांना 400 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिले आहेत. ही कंपनी म्हणजे एल्गी इक्विटपमेंट्स लिमिटेड कंपनी होय.

या एल्गी इक्विटपमेंट्स लिमिटेड कंपनीने भारतात भक्कम पाय रोवले आहेच आणि जगभरातील 100 हून अधिक देशांमध्ये तिचे कार्य व व्यवसाय आहे. ही कंपनी एअर कंप्रेसर आणि ऑटोमोबाईल सर्व्हिस स्टेशन उपकरणांच्या निर्मितीतील एक आघाडीची कंपनी आहे. 1960 मध्ये ही कंपनी स्थापित झाली.

या कंपनीने एअर कॉम्प्रेसर आणि गॅरेज उपकरणे तयार करणारी कंपनी म्हणून व्यवसायला सुरुवात केली होती. सध्या आता कंपनीकडे 400 हून अधिक उत्पादने आणि अँक्सेसरीज आहेत. कंपनीच्या उत्पादनांमध्ये खाणकाम, औषधनिर्माण, जहाजबांधणी, ऊर्जा, तेल आदी उद्योगांमधील वापराच्या उत्पादनाचा समावेश आहे.

शिवाय, या कंपनीच्या भारत, इटली आणि अमेरिकेमध्ये अत्याधुनिक उत्पादन सुविधा आहेत. जगभरातील 100 हून अधिक देशांमध्ये तिची उत्पादने, सेवा आहेत. तर कंपनीचे भारतभर पसरलेल्या 100 हून अधिक वितरकांचे विस्तृत जाळे आहे. त्यामुळे कंपनीने भक्कम पाया रोवल्याचे दिसते.

या कंपनीने गेल्या दोन वर्षांत गुंतवणूकदारांना असाधारण परतावा दिला आहे. माहितीनुसार, वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत 426 टक्क्यांची वाढ झाली आहे.  5 मे 2020 रोजी या कंपनीच्या शेअरची किंमत ही 64.30 एवढी होती, ती आता 2 मे 2022 रोजी 338.70 पर्यंत वाढली आहे.

गुरुवारी सकाळी 10 वाजता एल्गी इक्विपमेंट्स लिमिटेडचे शेअर बीएसईवर 0.12% वाढीसह 341.60 रुपयांवर व्यवहार करत होते. आर्थिक वर्ष 2021-22 मधील आक्टोबर ते डिसेंबर या तिस-या तिमाहीत कंपनीचा निव्वळ महसूल 26.48% ने वाढून 408.55 कोटी झाला.

आर्थिक

Join WhatsApp

Join Now