Share

indurikar maharaj : महाराष्ट्रात खरं कोणी बोलायचं नाही, जो बोलेल त्याचा गेम होतो…: इंदुरीकर महाराज स्पष्टच बोलले

indurikar maharaj

indurikar maharaj : प्रबोधनकार इंदुरीकर महाराज हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. इंदुरीकर महाराज हे नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. हे सांगण्याच कारण म्हणजे नुकतच त्यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं असून, ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

गुरूवारी श्री साई पालखी परिवार विदर्भ आणि साई भक्त साई सेवक परिवारच्यावतीने नाचू कीर्तनाचे रंगी हा इंदोरीकर महाराज यांचा कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता. विशेष बाब म्हणजे, या कीर्तन सोहळ्याला मोठ्या संख्येने नागपूरकर उपस्थित होते.

९ मार्च २०२३ मध्ये श्री सदगुरू साई चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने नागपूर ते शिर्डी पायी पालखी पदयात्रा काढण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. कीर्तन सोहळ्यात बोलताना इंदोरीकर महाराज यांनी एक वक्तव्य केलं आहे.  ‘महाराष्ट्रात खरं कोणी बोलायचं नाही, जो बोलेल त्याचा गेम होतो,’ असं महाराजांनी म्हंटलं आहे.

इंदोरीकर महाराज यांनी म्हंटलं आहे की, ‘देव पाहायचा नाही तर देव बनायचे आहे. ज्ञान आले तर देव बनाल असे जीवनतत्त्वज्ञान सांगत असताना इंदुरीकर महाराज यांनी म्हंटल आहे की, महाराष्ट्रात खरं बोलणाऱ्यांचे काय हाल होतात याचे वास्तव मांडले. महाराष्ट्रात खरं कोणी बोलायचं नाही, जो बोलेल त्याचा गेम होतो..’

सध्या इंदुरीकर महाराजांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘पैसा, सत्ता, संपत्ती आपल्या कामी येत नाही. दहा मिनिटांत आजीचा माजी होतो हे कळतही नाही. त्यामुळे ताकद, पैसा आणि सत्तेचा योग्य वापर करा. चांगले वागणे कधीच वाया जात नाही, असा सल्ला देखील इंदुरीकर महाराजांनी दिला आहे.

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now