Share

थांबायचं नाय गड्या थांबायचा नाय..; दे धक्का २ ‘या’ तारखेला होणार रिलीज; पहा धमाकेदार टिझर व्हिडीओ

महेश मांजरेकरांचा ‘दे धक्का’ चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या नजरेसमोरून जात नाही. एकाच चित्रपटात हास्य, विनोद आणि भावनिक पदर असलेल्या या चित्रपटाने लोकांचे प्रचंड मनोरंजन केलं होतं. आता या चित्रपटाचा ‘दे धक्का २’ देखील लवकरच येणार असून, त्याचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. माहितीनुसार आधीच निर्मात्यांनी या चित्रपटाची घोषणा केली होती, चित्रपट रिलीज करण्याची तारीख ही जाहीर करण्यात आली होती. पण कोरोना काळात या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मुहूर्तच मिळाला नाही. अखेर या चित्रपटाच्या रिलीजची घोषणा झाली.

महेश मांजरेकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ‘दे धक्का २’या चित्रपटातील कलाकार आणि त्यांची नावे जाहीर केली आहेत.  या व्हिडीओला त्यांनी एक भन्नाट कॅप्शन देखील दिले आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांना चित्रपट पाहण्याची प्रचंड उत्सुकता लागून आहे, अनेकांनी व्हिडीला सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या व्हिडीओला भन्नाट कॅप्शन दिलं आहे. थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय.. घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय.. १ २ ३ ४ “दे धक्का २” येतोय ५ ऑगस्ट २०२२ ला…’ अशा शब्दात त्यांनी दे धक्का २ चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. चित्रपटात शिवाजी साटम , मेधा मांजरेकर, मकरंद अनासपूरे, सिद्धार्थ जाधव अशी तगडी स्टारकास्ट आहे.

माहितीनुसार, या चित्रपटात जी ट्रीप करण्यात आली ती मुंबई -कोल्हापूर नसून, कोल्हापूर ते थेट लंडन असणार आहे. लंडनची झलक पाहून यंदा धमाल आणि मनोरंजनाचा मोठा डोस प्रेक्षकांना मिळणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

‘दे धक्का’ हा चित्रपट २००८ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट हॉलिवूडमधील २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लिटिल मिस सनशाइन’ या चित्रपटावर आधारित होता. आता ‘दे धक्का २’ मध्ये काय नवीन हंगामा बघायला मिळणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now