आपल्या लाडक्या मुलीचं लग्न थाटामाटात व्हावं अशी प्रत्येक आई – वडिलांची इच्छा असते. अगदी मुलीचा जन्म झाल्यापासून आई – वडील लग्नासाठी पैसे जुळवण्यास सुरुवात करतात. आपल्या मुलीच्या लग्नात काहीही कमी पडायला नको यासाठी ते रात्रंदिवस कष्ट करून पैसे जमवत असतात.
मात्र आम्ही तुम्हाला असं एक प्रकरण सांगणार आहोत, ते वाचून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. मुलीच्या लग्नासाठी पुरेसे पैसे नसल्याने आईने एक धक्कादायक कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी आईला बेड्या ठोकण्यात आल्या असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
वाचा नेमकं प्रकरण काय? ही घटना नवी दिल्लीतील असल्याचे उघडकीस आले आहे. बबली असे आरोपी महिलेचे नाव आहे. तिने हिना नावाच्या महिलेशी हातमिळवणी करून हे धक्कादायक कृत्य केले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर वाचा मुलीच्या लग्नासाठी आईने कशी केली पैशांची सोय..
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबली नावाच्या महिलेला आपल्या मुलीचं लग्न करायचं होतं. मात्र तिच्याकडे मुलीच्या लग्नासाठी पैसे नव्हते. मुलीच्या लग्नात पैशांची सोय करण्यासाठी एका मुलाला किडनॅप करण्याचा प्लान या महिलेने केला. सोबत हिना नावाची महिला घेतली.
धक्कादायक बाब म्हणजे प्लॅन करून महिलेने 2 वर्षांच्या मुलाचं अपहरण केलं. मात्र पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी त्या महिलांचा प्लॅन उधळून लावला. मुलाची विक्री करण्यापूर्वीच पोलिसांनी दोन्ही महिलांना बेड्या ठोकल्या. तसेच त्या मुलाची सुटका केली.
वाचा पोलिसांनी या महिलांना कसे पकडले? 2 एप्रिल रोजी दिल्लीच्या किशनगड पोलीस स्टेशनमध्ये एक 2 वर्षांचा अंश नावाचा मुलगा गायब झाल्याची पोलिसांकडे तक्रार आली. तपासादरम्यान पोलिसांना अंश गायब होण्यात हिना नावाच्या महिलेचा हात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी हिनाच्या घरी छापा मारला आणि प्रकरण उघडकीस आले.
महत्त्वाच्या बातम्या
VIDEO: मालकासाठी नव्हे तर ‘या’ साठी 8 KM रुग्णवाहिकेच्या मागे धावला घोडा; कारण वाचून रडालं
प्रेयसीला गुपचूप भेटायला आलेल्या तरुणाला घरच्यांनी पकडले अन्…असे काही केले की, वाचून बसेल धक्का
अंगठे बहादूर महिलेनी केली कमाल! स्ट्रॉबेरी शेतीतून कमवित आहे लाखो रुपये; महिलांसाठी बनली एक प्रेरणास्रोत
धक्कादायक! टिकली आणि हिजाब घातल्याने चौथीच्या विद्यार्थीनींना शिक्षकाने केली मारहाण, गुन्हा दाखल