Shambhuraj Desai: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे असंख्य बडे नेते शिंदे गटाला जाऊन मिळाले. मात्र अजूनही असे अनेक नेते आणि निष्ठावान शिवसैनिक आहेत. जे अडचणीच्या काळात सुद्धा उद्धव ठाकरेंची बाजू लावून धरतात. आणि शिंदे गटाला खुला आव्हान देतात. यामध्ये प्रसिद्ध वक्ते, शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचा समावेश होतो.
नितीन बानगुडे पाटील यांनी साताऱ्यामध्ये एका मेळाव्यात विद्यमान मंत्रिमंडळात उत्पादन शुल्क मंत्री झालेले शंभूराज देसाई यांच्याबद्दल मोठे विधान केले आहे. शंभूराज देसाईंच्या पाटण मतदारसंघात नवी मुंबई स्थित रहिवाशांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात नितीन बानगुडे पाटील उपस्थित होते.
बंडखोरी केलेल्या ३९ आमदारांना उद्धव ठाकरे बघून घेतील. मात्र शंभूराज देसाई यांना पाटण तालुक्यातील शिवसैनिक पुन्हा विधानसभेवर जाऊ देणार नाहीत, असा निर्धार यावेळी बानगुडे पाटील यांनी व्यक्त केला.
अशाप्रकारे शिवसेनेचे उपनेते असणाऱ्या नितीन बानगुडे पाटील यांनी साताऱ्याच्या शिवसैनिकांना उद्देशून हे आवाहन केले आहे. शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेनेची मोठी पडझड झाली. मात्र या कठीण काळात नितीन बानगुडे पाटील उद्धव ठाकरेंसोबत आहेत.
२०१४ साली नितीन बानगुडे पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. बानगुडे पाटलांची वेगळी ओळख म्हणजे ते प्रसिद्ध वक्ता व शिवव्याख्याते आहेत. महाराष्ट्रभरात हजारो तरुणांमध्ये ते लोकप्रिय असून गर्दी खेचून आणणारा वक्ता म्हणून शिवसेनेने त्यांना पक्षात घेतले.
बानगुडे पाटील यांना शिवसेनेने सातारा व सांगली संपर्कप्रमुखपदी नेमले. अल्पावधीतच त्यांना उपनेते करण्यात आलं. त्यानंतर त्यांना पक्षाने कृष्णा खोऱ्याचे महामंडळ उपाध्यक्षपद दिले. बानगुडे पाटलांचा प्रयत्नांमुळे कोरेगावमध्ये शिवसेनेचा उमेदवार विधानसभेवर गेला. शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून त्यांची ओळख आहे. याच बानगुडे पाटलांनी आणि साताऱ्यातल्या शिवसैनिकांनी शंभुराज देसाईंना आगामी निवडणुकीत विधानसभेवर न पाठवण्याचा चंग बांधल्याचे दिसते आहे.
महत्वाच्या बातम्या-
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; उद्धव ठाकरेंना मात्र मोठा दिलासा
Ajit Pawar : अजितदादांचा एकनाथ शिंदेंना भेदक सवाल; भर विधानसभेत मुख्यमंत्र्यांची बोलतीच बंद
‘मला परत-परत संशय येतोय की…,’ हरिहरेश्वर बोट प्रकरणी ४८ तासानंतर भाजप नेत्याचा धक्कादायक खुलासा