Share

ना घोडा, ना गाडी, ना कार, थेट स्ट्रेचरवर नवरदेव पोहोचला लग्नमंडपात, वाचा लग्नाची भन्नाट गोष्ट

लग्नाच्या दिवस आधी वराचा अपघात झाला. त्यात तो गंभीर जखमी झाला. मात्र तरीही वधूचे वरावर एवढे प्रेम होते की, तिने त्याच्यासोबतच लग्न करण्याचा अट्टहास धरला. त्यानंतर दोन्ही कुटूंबीयांनी चर्चा करून, ठरलेल्या मुहूर्तावर त्यांचे लग्न लावले. यावेळी वर चक्क रुग्णवाहिका मधून वधुला घेयला आला .

उदयपूर येथील सिंधी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात हा अनोखा नजारा पाहायला मिळाला. येथे वर आपल्या वधूला घेण्यासाठी रुग्णवाहिकेने आला. नंतर स्ट्रेचरच्या सहाय्याने त्याने मंडप गाठले. या वराचा पाच दिवसांपूर्वी अपघात झाला होता. यामध्ये वराचा एक पाय फ्रॅक्चर झाला होता.

पण वराने आपले सर्व त्रास बाजूला ठेवून ठरलेल्या तारखेला लग्न करण्याचा निर्णय घेतला. प्रतिकूल परिस्थितीतही आयुष्याच्या जोडीदाराला साथ देण्याचे आश्वासन देत वराने सात फेरे घेतले. वराचा हा उत्साह पाहून विवाह सोहळ्यात उपस्थित लोक भावूक झाले.

उदयपूरमध्ये महाशिवरात्रीला सिंधी समाजाने 25 वा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता. या विवाह सोहळ्यात लग्न करण्यासाठी उदयपूरच्या कोठीबागमध्ये राहणारा राहुल कटारिया पाच दिवस आधी एका अपघातात गंभीर जखमी झाला होता, त्यामुळे तो रुग्णवाहिकेने कार्यक्रमस्थळी पोहोचला.

या अपघातात राहुलचा एक पाय फ्रॅक्चर झाला. शुक्रवारीच राहुलचे अहमदाबादमध्ये ऑपरेशन झाले. उपचारादरम्यान राहुलच्या पायात रॉड घालण्यात आला. त्यामुळे त्याला चालता येत नव्हते. मात्र, मुलीचं देखील मुलावर प्रचंड प्रेम असल्यानं तिनं त्याच्याशी लग्नाचा हट्ट धरला. दोन्ही कुटूंबीयांनी त्यामुळे लग्नाला होकार दिला.

राहुलला देखील नाते जपण्याचा एवढा ध्यास होता की तो जखमी अवस्थेत लग्न विधी पार पाडण्यासाठी पोहोचला. त्यामुळे लग्न करण्यासाठी तो रुग्णवाहिकेतून लग्नसमारंभाला पोहोचले. रुग्णवाहिकेने आणल्यानंतर वराला स्ट्रेचरवर मँडमपर्यंत नेण्यात आले. वराला स्ट्रेचरवरच तयार करण्यात आले. यावेळी राहुलच्या कुटुंबीयांसह वधूनेही त्याला प्रोत्साहन दिले. हा आगळा वेगळा विवाह पाहून परिसरातील लोकांना देखील आश्चर्य वाटले.

इतर

Join WhatsApp

Join Now