Share

खाजगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट सुरूच; हायकोर्टाच्या निर्देशांना न जुमानता मनमानी कारभार

bus

खासगी ट्रॅव्हल्सचे प्रमाण सगळीकडेच प्रचंड वाढलेले पाहायला मिळतं आहे. नागरिक मोठ्या प्रमाणात खासगी ट्रॅव्हल्सचा वापर करताना पाहायला मिळत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात खासगी ट्रॅव्हल्सचा फायदा होतं आहे. मात्र असं असलं तरी देखील खासगी ट्रॅव्हल्सबद्दल एक मोठी बातमी समोर येतं आहे.

सर्वच नागरिक चांगल्या सुविधांसाठी प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सकडे वळले असल्याच पाहायला मिळतं आहे. मात्र असं असलं तरी देखील, आता या सेवेचीही वाट लागली असल्याच चित्र पाहायला मिळत आहे. मनमानी कारभार, अव्वाच्या सव्वा भाडे आणि प्रवाशांची अडवणूक असे प्रकार घडतं आहेत.

आता याच बद्दल एक बातमी समोर येतं आहे. अ‍ॅड.असीम सरोदे यांनी याबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे. यामुळे आता याच प्रकरणाची सध्या राज्यात चर्चा सुरू आहे. ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान सुरू असल्याच मत अ‍ॅड.असीम सरोदे यांनी मांडले आहे.

‘कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती भाडे राहील, याचे फलक ट्रॅव्हल्स कंपन्यांनी लावले पाहिजे. मात्र तसे काहीही होत नसल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान सुरू आहे, असे अ‍ॅड.असीम सरोदे यांनी स्पष्टच सांगितलं आहे. यावर अद्याप ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून स्पष्टीकरण आलेले नाहीये.

अ‍ॅड.असीम सरोदे यांनी पुढे म्हंटलं आहे की, ट्रॅव्हल्स कंपन्यांकडे सुट्ट्यांच्या कालावधीत किती दर राहतील, याबाबत माहिती असावी. याचबरोबर बस तपासणी सोबत दर किती आकारले जातात,  याची सखोल तपासणी केली पाहिजे. सर्वसाधारण व्यक्तींच्या व्यवसायाची कसून तपासणी होते.

मात्र श्रीमंत व्यक्तींच्या व्यवसायांची तपासणी का होत नाही. याबद्दल न्यायाधीशांनी दखल घ्यायला हवी. याबाबत आरटीओ आणि पोलीस यांनी संयुक्त कारवाई करावी, असं अ‍ॅड.असीम सरोदे यांनी म्हंटलं आहे. यामुळे आता ट्रॅव्हल्स कंपन्या याकडे नेमकं कस पाहतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
devendra fadanvis : फडणवीसांच्या खेळीमुळे आशिष शेलारांचा झाला गेम, भाजपने माघार घेतल्यामुळे पडले तोंडघशी
Sanjay Raut : माघार घेतली नसती तरी आम्ही जिंकलोच असतो, राऊतांनी थेट तुरूंगातून सांगीतला मताधिक्याचा आकडा
Shakti Kapoor : अभिनेत्रीचे शक्ती कपूरवर गंभीर आरोप, म्हणाली, बोल्ड सीन करताना तो एवढा उत्तेजीत झालता कि….
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now