राज्यात शिवसेनेने मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने भाजपाला डावलून राष्ट्रवादी – कॉंग्रेससोबत आघाडी करत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्यामुळे सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसायला लागलं. तेव्हा पासून शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद रंगला आहे.
एकीकडे विरोधक सत्ताधारी नेत्यांवर आरोप करत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी नेते सर्व आरोप फेटाळून लावत आहेत. अशातच ओवैसी यांच्या MIM नं महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी करण्याची तयारी केली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यामाध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांपर्यत निरोप पोहोचवा अशी विनंती केली आहे.
भाजपाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीसोबत एमआयएम पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएमने राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र येऊन लढण्याची ऑफर दिली आहे. एक खासदार, २९ नगरसेवक, दोन आमदार असलेल्या एमआयएमची राष्ट्रवादीला असलेली ऑफर सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना एमआयएमसोबत उघड किंवा छुपी हातमिळवणी होऊ शकत नाही हे स्पष्ट केले आहे. याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. ‘औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे कोणीही असतील ते महाराष्ट्राचे शिवसेनेचे आणि महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षाचे आदर्श होऊ शकत नाही. त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची उघड किंवा छुपी आघाडी होऊ शकत नाही, असे राऊत म्हणाले.
दरम्यान, औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत आघाडी कशी होऊ शकते? तुम्ही विचारच कसा करू शकता? असा विचार करणंच एक आजार आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं. तसेच महाराष्ट्रात तीन पक्षाचं सरकार आहे. चौथा त्यात येणार नाही. तीनच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
तसेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विचारांनी चालणारे पक्ष आहेत. हेच आमचे आदर्श आहेत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या पुढे कबरीपुढे जाऊन गुढघे टेकतात आणि औरंगजेब त्यांचा आदर्श आहे ते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाही, असे राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? भाजपाचे ५० आमदार मविआच्या संपर्कात; बड्या नेत्याच्या दाव्याने उडाली खळबळ
‘त्यावेळी फारूक अब्दुल्ला नाही, तर राज्यपालांचं शासन होतं’; ‘द काश्मीर फाईल्स’ वर ओमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
पुण्यात डिलिव्हरी बॉयचं तरुणीसोबत अश्लील कृत्य; पार्सल देण्यासाठी आला आणि पॅन्टची चेन काढून…
रंगाचा बेरंग ! सोसायटीच्या धुलिवंदनात बेधुंद होऊन नाचला, घरी पोहोचल्याच्या थोड्याच वेळात तरुणाचा मृत्यू