सध्या मराठी चित्रपटसृष्टीत देखील अग्रेसर दिसून येत आहे. अनेक नवनवीन बदल या क्षेत्रात झाले आहेत. तसेच असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी या चित्रपट सृष्टीला उच्च स्थानी घेऊन जाण्यासाठी कष्ट घेतले. त्याचबरोबर या कलाकारांनी आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत स्थान निर्माण केले. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना ही वेड लावले.
यामधील लोकप्रिय नावे म्हणजे अभिनेत्री निवेदिता सराफ, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे. या कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले होते. मात्र हे कलाकार पडद्यामागे ही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. मात्र लक्ष्मीकांत बेर्डे यांना जास्त काळ आपल्या मित्रमैत्रिणीसोबत राहता नाही आले. तरी देखील ते आज चाहत्यांच्या आणि त्यांच्या मित्रांच्या मनात आज ही जिवंत आहेत.
तसेच निवेदिता यांनी नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. खरंतर निवेदिता यांना स्वयंपाकाची खूप आवड आहे. अभिनयासह ते आपली स्वयंपाकाची आवड ही जपतात. त्या प्रत्येक आठवड्याला विविध पदार्थांच्या रेसिपीचा व्हिडिओ करून त्यांच्या युट्यूब चॅनलवर पोस्ट करतात. नुकताच त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी एक खास पदार्थ बनवला आहे.
विशेष म्हणजे हा पदार्थ दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांना खूप आवडायचा. या रेसिपीचा व्हिडीओ पोस्ट करत असताना निवेदिता यांनी लक्ष्मीकांत सोबतच्या आठवणींनाही उजाळा दिला आहे. त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट करता लिहिले आहे की, ‘ही रेसिपी माझ्या हृदयाजवळची आहे, कारण माझा जिवलग मित्र लक्ष्मीकांत बेर्डेची ही अत्यंत आवडती डिश होती. ही आगरी डिश बनवण्यास सोपी असून ती चविष्टसुद्धा आहे.’
त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये त्या म्हणाल्या की, “आज मी जो पदार्थ बनवणार आहे तो माझ्या जवळच्या मित्राचा, बालमित्राचा आवडता पदार्थ होता. तो बालमित्र म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्यासोबत मी अनेक चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. माझं लग्न झाल्यानंतर आम्ही १० वर्षे एकमेकांचे शेजारी होतो. लक्ष्याला खोबऱ्यातली सुरमई खूप आवडायची. नाश्ता असो, दुपारचं जेवण असो, संध्याकाळी असो किंवा मग रात्रीच्या जेवणात असो, ही डिश कधीही खायची त्याची तयारी असायची,”
तसेच निवेदिता यांची ही रेसिपी प्रेक्षकांना खूप आवडली. तसेच अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स करून कौतुक देखील केला आहे. निवेदिता सराफ यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, काही दिवसांपूर्वी त्यांची ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका आली होती. त्यांची ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली होती. या मालिकेत त्यांनी आसावरीची भूमिका साकारली होती. मालिकेच्या भूमिकेतही त्यांना स्वयंपाकाची प्रचंड आवड असल्याचे दाखवले होतं. तसेच त्यांनी अनेक चित्रपटांत काम केले आहे.