नितीश कुमार (Nitish Kumar): महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपामुळे राज्यात प्रचंड उलथापालथी झाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी केली. त्यानंतर भाजपसोबत मिळून त्यांनी आपले सरकार स्थापन केले. महाराष्ट्रातील या उलथापालथीनंतर आता बिहारमध्येही काहीशी अशीच परिस्थिती पाहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्लीत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ते आता काँग्रेससोबत युती करणार का? अशा चर्चा सर्वत्र सुरु आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार हे नीती आयोगाच्या बैठकीच्या निमित्ताने दिल्लीत आले होते. यादरम्यान या भेटीगाठी झाल्या असल्याचे बोलले जात आहे.
मंगळवारी नितीश कुमार यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली असून या बैठकीत ते आपला निर्णय जाहीर करणार असल्याची शक्यता आहे. या बैठकीला पाटण्यामध्ये सर्वपक्षीय आमदार आणि खासदार उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या महिनाभरापासून भाजप आणि नितीश कुमार यांच्यात फारसे पटत नसल्याचे बोलले जात आहे.
बिहारमध्ये एनडीएचे सरकार पडून नितीश कुमार राजदसोबत पुन्हा सरकर स्थापन करणार असल्याचेही बोलले जात आहे. त्यासाठी त्यांनी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. याशिवाय भाजपचे अनेक निर्णय नितीश कुमार यांच्या मनाविरुद्ध झाले असल्याची चर्चा आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून भाजपसोबतच्या बैठकांसाठी नितीश कुमारांची टाळाटाळ सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. १७ जुलैला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली होती. तेव्हा नितीश कुमार या बैठकीमध्ये सहभागी झाले नव्हते. त्यानंतर नितीश कुमार यांना २२ जुलै रोजी झालेल्या तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोप समारंभाला आमंत्रित करण्यात आले होते, परंतु तेव्हाही ते उपस्थित झाले नव्हते.
पुढे, नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या २५ जुलै रोजी झालेल्या शपथविधीच्या कार्यक्रमालादेखील नितीश कुमारांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, तेव्हादेखील ते गेले नाहीत. त्यानंतर ७ ऑगस्टला पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या नीती आयोगाच्या बैठकीलाही ते हजर राहिले नाहीत. त्यामुळे ते भाजपपासून दूर राहत असल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
Karan Mehra: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या ‘नैतिक’ने आपल्या पत्नीवर केले गंभीर आरोप, म्हणाला – ज्या भावासोबत ती राखी बांधायची त्याच्यासोबत…
Riteish Deshmukh: रितेश देशमुखचा ‘तो’ चित्रपट ज्याने विलासराव देशमुखांची खुर्ची आली होती धोक्यात, वाचा किस्सा
Lal Singh Chaddha Review: रिलीज व्हायच्या आधीच समोर आला ‘लाल सिंग चड्ढा’चा रिव्ह्यू, वाचा आणि मगच जा पाहायला
Aamir’s sister VIDEO: ६० व्या वर्षीही आमिरच्या बहिणीची बोल्डनेस कायम, मुलीच नजर चुकवून पतीला केलं लिपलॉक किस