nitin raut injured in bharat jodo yatra | भारत छोडो यात्रा गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत आहे. आज या यात्रेचा ५६ वा दिवस आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथून आज सकाळी काँग्रेसची भारत जोडो यात्रा पुन्हा सुरू झाली, ज्यामध्ये चित्रपट अभिनेत्री आणि निर्माती पूजा भट्ट सामील झाल्या होत्या.
तसेच या यात्रेत माजी उर्जा मंत्री नितीन राऊत सुद्धा सामील झाले होते. पण या यात्रेत त्यांच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. नितीन राऊत यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली आहे. या धक्काबुक्कीत नितीन राऊत गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी धक्काबुक्की केल्यामुळे ते पडले होते. यावेळी ते गंभीर जखमी झाले आहे. नितीन यांना हैदराबाद येथील वासवी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा फोटो समोर आला आहे ज्यामध्ये ते हॉस्पिटलच्या बेडवर पडलेले दिसत आहे. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून डोळा पूर्ण सुजलेला दिसत आहे. तसेच त्यांच्या पायालाही दुखापत झाली आहे.
येत्या काही दिवसांमध्ये ही यात्रा आता महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे नितीन राऊत सध्या राहूल गांधी यांच्यासोबत आहे. त्यावेळी राहूल गांधींना पाहण्यासाठी लोकांनी रस्त्यावर प्रचंड गर्दी केली होती. त्यावेळी पोलिसांचा बराचवेळा ती गर्दी हटवण्यात गेला. त्यावेळी एका पोलिस अधिकाऱ्याने नितीन राऊत यांना धक्का दिला. त्यामुळे खाली पडल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवार १ नोव्हेंबर २०२२ रोजी भारत जोडो यात्रेदरम्यान चार मिनारसमोर तिरंगा फडकावला होता. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश, दिग्विजय सिंह, तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रेवंत रेड्डी हेही उपस्थित होते.
त्याचदिवशी सुमारे ३२ वर्षांपूर्वी राहुल गांधींचे वडील राजीव गांधी यांनी चार मिनारवरच तिरंगा फडकवून सदभावना यात्रेची सुरुवात केली होती. भारत जोडो यात्रा ७ सप्टेंबर २०२२ रोजी कन्याकुमारी, तामिळनाडू येथून सुरू झाली. तामिळनाडू ते केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश ते गुजरात असा हा प्रवास तेलंगणापर्यंत पोहोचला आहे. ही यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये संपणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
T-20 World Cup : T-20 विश्वचषकावर पसरली शोककळा; ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूचे अचानक निधन, खेळाडूंना धक्का
shivsena : सत्ता गेली तरी पक्षाला लागलेली गळती थांबेणा; मातोश्रीचा निष्ठावंत नेता शिंदे गटात सामील
shivsena : शिंदेंचं सरकार कोसळणार आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार; सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर मोठी अपडेट