सध्या भारतात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे कसोटी सामने होत आहे. आता दिल्लीमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा दुसरा सामना सुरु आहे. पहिला सामना भारतीय संघाने जिंकला आहे. त्यामुळे भारतीय संघ १-० ने आघाडीवर आहे. अशात दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच पंचाच्या निर्णयामुळे एक वाद झाल्याचे दिसून आले.
दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या दिवशी पंचाच्या एका निर्णयामुळे वाद होत आहे. भारतीय संघ अडचणीत होता असे असतानाच नितीन मेनन यांनी विराट कोहलीला बाद दिल्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना धारेवर धरले आहे. एलबीडब्ल्यु बाद नसतानाही विराटला बाद देण्यात आले असे अनेकांचे म्हणणे आहे.
ऑस्ट्रेलियन गोलंदाज कुहनेमच्या गोलंदाजीवर विराट कोहलीच्या पॅड आणि बॅटला एकाच वेळी बॉल लागला. पंचाने त्याला बाद दिले. त्यानंतर विराटने याबाबत तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली. मात्र त्यांनाही याबाबत बाद की नाबाद हे कळलं नाही. त्यानंतर त्यांनी मैदानातील पंच यांच्यावर निर्णय सोडला.
नितीन मेनन यांनी आपला निर्णय कायम ठेवत विराटला तंबुत पाठवले. पण तुम्हाला माहितीये का? नितीन मेनन यांची कारकिर्द फक्त २४ तासातच संपली आहे. नितीन मेनन हे ३९ वर्षांचे आहे. त्यांचा जन्म १९८३ मध्ये इंदोरमध्ये झाला होता. त्यांनी क्रिकेटमध्ये फलंदाज म्हणून पदार्पण केले होते, पण त्यांची कारकिर्द फक्त २४ तासातच संपली होती.
नितीन मेनन यांनी ८ जानेवारी २००४ रोजी विदर्भाविरुद्ध पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी शेवटचा सामना ९ जानेवारी २००४ रोजी मध्य प्रदेशविरुद्ध खेळला होता. त्यामुळे त्यांची कारकिर्द ही फक्त २ सामन्यांपूरतीच होती. त्यांनी दोन सामन्यात फक्त १ डाव खेळला आणि त्यामध्ये त्यांनी ७ धावा केल्या होत्या.
नितीन मेनन यांनी क्रिकेट सोडल्यानंतर पंच बनण्याचा निर्णय घेतला. मेनन यांनी २०१५-१६ मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये पंच म्हणून काम केले होते. २६ जानेवारी २०१७ मध्ये त्यांनी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामन्यात पंच म्हणून काम केले. त्यांनी आतापर्यंत १९ कसोटी सामने, ४२ एकदिवसीय सामने आणि ६१ टी २० सामन्यांमध्ये अंपायरिंग केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
शिवसेनेची संपत्ती, कार्यालय, निधी यावर कोणाचा हक्क शिंदे गट की ठाकरे गट? कायदेतज्ज्ञ म्हणाले…
उद्धव ठाकरेंनंतर आता राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या निशाण्यावर; आता मनसेला दिला ‘हा’ मोठा धक्का
उद्धव ठाकरेंना शिवसेना नाव आणि चिन्ह परत मिळू शकते? जाणून घ्या कायदेतज्ज्ञ काय म्हणाले…