Share

नितीन गडकरींची संसदेत मोठी घोषणा; पुढच्या तीन महिन्यांत ‘हे’ टोल नाके होणार कायमचे बंद

जर तुम्ही हायवेवर (Highways) प्रवास करत असाल आणि टोल टॅक्स (toll tax) भरून थकले असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी मंगळवारी लोकसभेत मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, सरकार येत्या 3 महिन्यांत अनेक अवैध टोलनाके बंद करणार आहे. तसेच आता सरकार महामार्गावरील टोलची रक्कम कमी करणार आहे आणि 60 किमी अंतरावर एकच टोलनाका ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.(nitin-gadkaris-big-announcement-in-parliament-related-toll)

एवढेच नाही तर आता स्थानिकांनाही कर भरावा लागणार नाही. त्यांच्या विभागाकडून पास काढले जातील. येत्या तीन महिन्यांत ही नवी प्रणाली कार्यान्वित होणार आहे. आज लोकसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली की सरकार येत्या 3 महिन्यांत देशातील टोल प्लाझाची संख्या कमी करणार आहे. तसेच, 60 किमीच्या परिघात फक्त एकच टोल प्लाझा कार्यरत असेल.

https://twitter.com/OfficeOfNG/status/1506228938833825795?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1506228938833825795%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.aajtak.in%2Fauto%2Fnews%2Fstory%2Fnitin-gadkari-big-announcement-toll-collection-points-within-60-km-of-highways-will-be-closed-in-three-months-tutk-1432912-2022-03-22

आज लोकसभेत हे विधान करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, 60 किमीच्या परिसरात येणारे इतर टोलनाके येत्या 3 महिन्यांत बंद केले जातील. त्याचवेळी, केंद्रीय मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, टोल प्लाझाजवळ राहणाऱ्या लोकांना टोल भरावा लागणार नाही, त्यांना पास जारी केला जाईल. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला दिलासा मिळणार आहे. तसेच अधिकाधिक लोकांना टोल भरून महामार्गावरून प्रवास करण्यास प्रवृत्त केले जाईल.

खरे तर महामार्गावरील वाहतूक वाढवून टोलचे उत्पन्न वाढवण्यावर सरकारचा भर आहे. त्याचबरोबर टोलनाक्याजवळ राहणाऱ्या नागरिकांना टोलमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी लोकल राहणाऱ्यांनी सतत केली होती. स्थानिक असल्याने त्यांना सतत प्रवास करावा लागत आहे असेही त्याच मत होत. टोल प्लाझाजवळ राहणाऱ्यांनाही सरकारच्या या नव्या योजनेचा भरपूर फायदा मिळण्याची अपेक्षा आहे.

नितीन गडकरी यांनी सभागृहात सांगितले की, देशात रस्ते सुरक्षा वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. आम्ही सरकारच्या वतीने हे काम केले आहे की, आता देशात कोणतेही वाहन बनवल्यास त्यात 6 एअरबॅग अनिवार्य असतील. त्याच वेळी, आम्ही रस्ते अभियांत्रिकी सुधारण्यासाठी देखील काम करत आहोत.

नितीन गडकरी म्हणाले की, सध्या जगातील 11 टक्के रस्ते अपघात भारतात होतात. दरवर्षी सुमारे 5 लाख लोक रस्ते अपघातांना बळी पडतात. ज्यामध्ये सुमारे 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो. अशा दुर्घटना कमी करण्याचा आपल्याला प्रयत्न करावा लागेल.

महत्वाच्या बातम्या-
जगातील सगळ्यात घातक विष साईनाईडची टेस्ट कोणालाच नाही माहिती पण आम्ही तुम्हाला सांगतो, वाचा सविस्तर..
रनवे ३४ ट्रेलर: जेव्हा पायलटने सिगरेट ओढल्यामुळे झाला होता ५१ लोकांचा मृत्यु, वाचा खरी कहाणी
Attack Trailer 2: जॉन अब्राहम बनला सुपर सोल्जर; अडीच मिनिटात केला नुसता धुराळा
अमिताभसारखा मोठा सेलिब्रिटी आंबेडकरांच्या पाया लागतो हे भाजपच्या लोकांना खटकलंय का?

 

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now