केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील टोल माफ केला जाणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. राज्यसभेत बोलताना नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यसभेत नितीन गडकरींना थंबीदुराई यांनी प्रश्नोत्तराच्या तासावेळी शहराजवळ एक्स्प्रेस वेवर टोलनाके उभे केल्यानं संबंधित शहरातील नागरिकांना आर्थिक फटका बसत असल्याचं सांगितलं. स्थानिक नागरिकांना एक्स्प्रेस वेच्या कमी वापरासाठी देखील टोल भरावा लागत असल्याचं नितीन गडकरींच्या निदर्शनास आणून दिलं.
त्यावर नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत त्यांच्या खात्यासंदर्भातील प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. राज्यसभेच्या खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना देशातील टोलनाक्यांचा जनक मीच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आम्ही १९९० च्या दशकात महाराष्ट्रात पहिल्यांदा मंत्री असताना त्या तत्त्वावर महामार्ग बांधल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
तसेच गडकरी म्हणाले, २०१४ पूर्वी यूपीएचं सरकार असताना शहरांजवळ टोलनाके उभारण्यात आले आणि नागरिकांना टोल भरावे लागले. नागरिक एक्स्प्रेस वेचा १० किलोमीटरचा प्रवास करतात आणि त्यांना ७५ किलोमीटरचा टोल भरावा लागतो हे दुर्दैवी आणि बेकायदेशीर आहे, आम्ही यामध्ये सुधारणा करु.
म्हणाले, आता आपण नवी पद्धत आणत आहोत. त्यामुळं शहरी भागातील लोकांना टोल भरण्यातून वगळलं जाईल. शहरातील लोक १० किलोमीटरचा रस्ता वापरतात आणि ७५ किमीच्या वापराचा टोल भरतात. हे चुकीचं आहे. मात्र, हा माझ्या काळातील प्रश्न नाही, मागील सरकारच्या काळातील हा प्रश्न आहे.
पण आता आम्ही त्यात दुरुस्ती करु, असे गडकरी म्हणाले. तसेच म्हणाले, सुदैवानं आणि दुर्दैवानं टोलनाका पद्धतीचा जनक मीच आहे. देशात पहिल्यांदा टोल पद्धत मीच सुरु केली आहे. बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावंर आम्ही ठाण्यात याची सुरुवात केल्याचं नितीन गडकरी म्हणाले.