वर्धा जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला होता. या अपघातात एक, दोन नव्हे तर तब्बल सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या विद्यार्थ्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार विजय राहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले याचा देखील समावेश होता. रविवारी नितीन गडकरी (nitin gadkari ) यांनी रहांगडाले कुटुंबियांची सपत्नीक भेट घेतली. (nitin gadkari visit mla vijay rahangdale home)
तसेच गडकरींना पाहताच विजय रहांगडाले ओक्साबोक्शी रडू लगाले. त्यांना अपघातासंदर्भातील माहिती विजय रहांगडाले यांनी दिली. विजय रहांगडाले यांची भेट घेतल्यानंतर गडकरींनी त्यांच्या पत्नीही भेट घेतली. “खूप मोठं संकट आहे,” असं म्हणत गडकरींनी रहांगडाले यांच्या पत्नीला नमस्कार केला.
मुलाच्या निधनानंतर आमदार विजय राहांगडाले यांनी फेसबुकवर मुलाच्या आठवणीत फेसबुक पोस्ट केली आहे. रहांगडाले आपला मुलगा आविष्कार रहांगडाले याच्या आठवणीत कविता पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी मुलगा अपघातात गेल्याने त्याच्या आईला झालेले दुःख वर्णन केले. तसेच त्याला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न देखील कसे तुटले याबद्दल वर्णन केले आहे. शेवटी त्यांनी तू का रे गेलास परत ये आविष्कार अशी भावनिक गळ कवितेमधून घातली आहे.
कवितेचे शब्दांकन करणारे राकेश साठवणे म्हणतात, आमदार विजय रहांगडाले यांच्यासोबत माझे जवळचे सबंध आहेत. ते नागपूरला आले की नेहमी भेटतात. हक्कानं माझ्या घरी येतात. आविष्कारला फोटोग्राफीची आवड होती. हे धडे तो माझ्याकडून घ्यायचा.
तसेच म्हणाले की, आज कविता लिहीत असताना सतत आविष्कारचा चेहरा डोळ्यांसमोर येत होता. एक एक शब्द मांडत होतो तसे रडायला येत होते. अशा भावना कवितेचे शब्दांकन करणारे राकेश साठवणे यांनी व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले होते. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची भरपाई जाहीर केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
लग्नाला पोहोचायच्या आधीच मृत्यूने गाठलं, वऱ्हाडाच्या गाडीचा अपघात, चौघांचा मृत्यू
१२ जणांशी अफेअर ठेवूनही ‘या’ अभिनेत्रीला मिळालं नाही खरं प्रेम, आता ५० व्या वर्षी म्हणते…
…तर नितेश राणेंना होणार अटक; सरकारी वकिलांनी केलेल्या विधनाने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
भारताच्या स्वयंपाक घरात वर्षानुवर्षे राज्य करणारा ‘डालडा ब्रँड’ आता संपुष्टात का आला? वाचा कहाणी