सध्या राज्यात कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यावरुन भाजप नेते ठाकरे सरकारला सुनावत आहे. तर सत्ताधारी नेतेही यावरुन केंद्राकडे बोट दाखवत आहे. असे असताना आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. (nitin gadkari on coal shortage)
कोळशाचे अधिक उत्पादन वाढविणे आता आवश्यक झाले आहे. प्रशासनाने ४-४ वर्षे फाईल दाबून ठेवणे बंद करावे. यापूर्वीच कोळशाचे उत्पादन वाढले असते तर आज कोळशाचा तुटवडा जाणवला नसता, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.
नितीन गडकरी नागपूरात एका कार्यक्रमासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी कोळशाच्या तुटवड्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. कोळसा कंपनी वेस्टर्न कोल फिल्ड्सने स्वस्त कोळसा दिल्यामुळेच आज गरीबांना स्वस्त वीज मिळत आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
तसेच यावेळी गडकरी यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांवरही निशाणा साधला आहे. काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे कोळशांसोबत दगडही पाठवले जात आहे. नाशिक-कोराडातील औष्णिक वीज प्रकल्पात कोळशातून दगडाचे ढीग पाहायला मिळत आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटेल आहे.
तसेच ज्या कोळशाच्या खाणी बंद आहेत किंवा आर्थिक अडचणीत आहे. त्या कोळसा खाणी सुरु करण्यासाठी खाजगीकरणाचा वापर सुरु करुन पाहावा, असा सल्ला नितीन गडकरी यांनी दिला आहे. शासनाने कोळसा कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
अमोनियम नायट्रेटचा तुटवडा आपल्या देशात आहे. वेस्टर्न कोल फ्लिड्सने अमोनियम नायट्रेट व मिथेनचे उत्पादन करण्याची परवानगी द्यावी. यासोबतच डीएमई बनविले तर घरगुती वापरासाठी गॅसमध्ये ते मिसळला येईल व सिलेंरचा दरही स्वस्त करता येईल, असेही नितीन गडकरी म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
“सदावर्तेंची जीभ हासडणाऱ्याला ११ लाख अन् जी महिला कामगार त्यांच्या हातात बांगड्या भरेल तिला ५ लाख”
१५ वर्षात अखंड भारत होईल म्हणणाऱ्या भागवतांना राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले..
महेशबाबूने खरेदी केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची ऑडीची इलेक्ट्रिक कार; फोटो शेअर करत म्हणाला,..